पुरंदर तालुक्यातील पुरंदर नागरी पतसंस्थेची सहकारी बँकेकडे वाटचाल :माजी आमदार संजय जगताप सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सभासदांनी संस्थापक स्वर्गवासी चंदूकाका जगताप यांच्यावर विश्वास ठेवून ,संस्था वाढवल्यामुळे पुरंदर नागरिक सहकारी पतसंस्थेची वाटचाल नागरी सहकारी बँकेकडे सुरू असून, यापुढेही असाच विश्वास ठेवून ,आशीर्वाद द्यावेत असे आव्हान संस्थेच्या अध्यक्षा आनंदी (काकी) जगताप आणि उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी यांच्या वतीने माजी आमदार संजय जगताप यांनी केले आहे. सासवड (ता. पुरंदर )येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची 37सावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दि. 28 रोजी आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात सनदी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप आणि संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. संस्थापक स्वर्गवासी चंदुकाका जगताप यांच्या प्रतिमापूजनाने सभेची सुरुवात झाली, सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा ,तसेच कर्मचारी साधना धेंडे यांचा सेवापुर्ती निमित्त गौरव करण्यात आला. संचालक डॉ. विनायक खाडे यांनी प्रास्ताविक तर सर व्यवस्थापक अनिल उरवणे यांनी अहवाल वाचन केले. दिलीप गिरमे, आनंदा तांबे ,चंद्रशेखर जगताप, नाना भिंताडे, महादेव टिळेकर, राहुल गायकवाड ,हरिभाऊ बाठे आधी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.संस्थेच्या 31 मार्च अखेर संस्थेच्या 13 शाखा 14,347 सभासद ,348 कोटी 22 लाखाच्या ठेवी, 25 कोटीच्या अधिकृत भाग भांडवल, 13 कोटी दोन लाखाचा राखीव निधी, 4 कोटी 44 लाखाच्या स्थावर मालमत्ता ,92 कोटी 90 लाखाची गुंतवणूक ,266 कोटी 44 लाख रुपयाचे कर्ज वाटप असून, एक कोटी पाच लाख 88 हजार रुपयांचा निव्वळ नफा झालेला आहे. सतत ऑडिट वर्ग "अ"असून यंदाही संस्थेने सभासदांना 10% लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले. यावेळी रमणिकलाल कोठडीया, संदीप फडतरे ,मंगेश घोणे, एडवोकेट युवराज वारघडे, नंदकुमार जगताप, संचालक अंकुश जगताप ,राजेश इंदलकर, युगंधरा कोंढरे, अनिल कामठे ,बाबासाहेब चौंडकर, चंद्रकांत बोरकर, परशुराम तांबे ,सूर्यकांत कांबळे, अमोल सातभाई ,अडवोकेट किशोर मस्के, पोपटराव सोनवणे, कल्याण जेधे, सुनील खोपडे ,नंदकुमार निरगुडे, घनश्याम तांबे, व्यवस्थापक सतीश शिंदे ,हरिभाऊ शिंदे आदी उपस्थित होते .नंदकुमार सागर यांनी सूत्रसंचालन केले. तर संचालक आनंदराव घोरपडे यांनी आभार मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments