पुरंदर तालुक्यातील सासवड सोनोरी रस्त्यासाठी शेतकरी आक्रमक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ते सोनोरी या सुमारे पाच किलोमीटरच्या रस्त्याची ठिक ठिकाणी खड्डे पडल्याने, चाळण झालेली आहे, या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने, रस्त्यावर डबकी तयार झालेली आहेत, वारंवार मागणी करूनही, रस्त्याची कामाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, यामुळे आक्रमक झालेल्या परिसरातील नागरिकांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे, या रस्त्यावरील खड्ड्यामुळे सोनोरी गावातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार व दूध उत्पादकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक दुचाकी स्वरांचा अपघात झालेला आहे, तसेच अर्धवट कामामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने, शेतकऱ्यांना दुचाकी वर शेतमाल नेताना मोठी कसरत करावी लागत आहे, या खड्ड्यामुळे सोनोरी रस्त्यावर अपघाताची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे या रस्त्याबाबत प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली दिली आहेत, परंतु या निवेदनाला प्रशासनाने केराची टोपली दाखवलेली आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे .त्यामुळे पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात विविध मागण्यासाठी शुक्रवार दि. 3 ऑक्टोंबर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे, याबाबत नागरिकांनी असा निर्णय घेतलेला आहे. याबाबत तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन देण्यात आले आहे .यावेळी सोनोरीचे माजी सरपंच भारत मोरे ,नितीन काळे, संतोष काळे ,तंटामुक्तीचे समितीचे अध्यक्ष दिपक झेंडे, मयूर काळे आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments