Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी पोलीस निरीक्षक पदी कुमार कदम यांची नियुक्ती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी कुमार रामचंद्र कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, या अगोदर कुमार कदम यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक पदावर सेवा बजावली आहे, सासवडचे यापूर्वीचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी यांची पुणे ग्रामीण नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे, कुमार कदम यांच्या नियुक्तीनंतर सासवड पोलीस ठाण्याला अनुभवी पोलीस अधिकारी मिळाल्याने, शहरवासीयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.नवीन पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत करताना काही सामाजिक व राजकीय संघटनाचे तसेच अवैध कार्यात गुंतलेल्या काही लोकांची सुद्धा सासवड पोलीस स्टेशन मध्ये ये जा सुरू झाली आहे, तरी कदम यांनी अशा लोकांकडे दुर्लक्ष करावे, अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा व्यक्त होत आहे. अतिशय डॅशिंग व त्याच पद्धतीने संवेदनशील पद्धतीने अधिकारी म्हणून कुमार कदम यांची सासवड पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून, विनाकारण कोणावरही अन्याय होणार नाही, तर खरा गुन्हेगार याची कायद्याच्या कसोटी मधून सुटणार नाही, असेही स्पष्ट भूमिका कुमार कदम यांची अशी ओळख असून, त्यांनी आपल्या पोलिस दलात 19 वर्षापासून कार्यरत असताना, अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत, त्यामुळेच त्यांची सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चालणारे सर्व अवैध धं दे त्या ठिकाणी रोखावेत यासाठी त्यांची मदत होणार आहे, असे सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments