जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त वाघिरे महाविद्यालयात विविध कार्यक्रमांची रेलचेल सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाघिरे महाविद्यालय, सासवड येथील मानसशास्त्र विभागाने ९ आणि १० ऑक्टोबर २०२५ रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.पोस्टर प्रदर्शनातून मानसिक आरोग्याचा संदेशकार्यक्रमाची सुरुवात ९ ऑक्टोबर रोजी एस.वाय., टी.वाय. आणि एम.ए. मानसशास्त्र विशेष (स्पेशल) विषयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पोस्टर प्रदर्शनाने झाली. विद्यार्थ्यांनी मानसशास्त्रातील विविध विषयांवर अत्यंत माहितीपूर्ण आणि आकर्षक पोस्टर्स तयार केली होती. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, सासवड नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण आणि राम कारंडे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या पोस्टरमधील माहिती जाणून घेतली आणि त्यांना प्रोत्साहन दिले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे आणि प्रयत्नांचे कौतुक केले.'प्रेम, मैत्री, आकर्षण आणि मानसिक आरोग्य' विषयावर डॉ. पाठक यांचे व्याख्यानजागतिक मानसिक आरोग्य दिवस अर्थात १० ऑक्टोबर २०२५ रोजी महाविद्यालयात डॉ. सागर पाठक यांचे 'प्रेम, मैत्री, आकर्षण आणि मानसिक आरोग्य' या विषयावर सुंदर व्याख्यान झाले. डॉ. पाठक यांनी अत्यंत सोप्या भाषेत या महत्त्वाच्या विषयांचे मानसिक आरोग्याशी असलेले सखोल नाते स्पष्ट केले. विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान अत्यंत उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरले.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य (कला विभाग) डॉ. संजय झगडे सर, उपप्राचार्य (विज्ञान विभाग) डॉ. बी. यू. माने, वाणिज्य समन्वयक प्रा. एन. एस. गिरी, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुनील शिंदे, प्रा. महेश देवकर, प्रा. पूर्वाराणी जगताप, प्रा. विजया वानखेडे यांच्यासह मानसशास्त्र विभागाचे सुमारे ५० विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments