इंदापूरच्या हरिश डोबाळेची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी ... सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ओडिसा राज्यातील संभलपूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील न्हावी गावच्या हरिश दिपक डोंबाळे या सायकलपटुने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले . दि. 2 डिसेंबर ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान नॅशनल सायकलींग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित ओडिसा संभलपुर येथे ज्युनियर नॅशनल सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .१८ वर्ष वयोगटातील स्पर्धेमध्ये १०० किलोमीटर मास स्टार्ट सायकलिंग इव्हेंटमध्ये हरीशने महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवत यश संपादन केले . इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील छोट्याशा असलेल्या न्हावी गावच्या हरिश डोंबाळे या सायकलपटुने सातत्यपूर्ण सराव आणि कठिण मेहनतीच्या जोरावर याआधीही राष्ट्रीय शालेय स्पर्धा , तसेच फेडरेशन सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक रौप्यपदक कास्यपदकांची कमाई केलेली आहे . आई-वडिलांचे प्रोत्साहन व पाठिंबा आणि अथक परिश्रमाच्या जोरावर हरीशने मिळवलेले दैदिप्यमान यश हे ग्रामीण भागातील युवकांना व खेळाडुंसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे . हरिशने राष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक ही इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद बाब असून इंदापूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्याची प्रतिक्रिया हरिश डोंबाळेचे वडील दिपक डोंबाळे आणि आई आशाताई डोंबाळे यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय सायकलपटु हरिशच्या या कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments