Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड मधील वृत्तपत्रे विक्रेते शकिल सिकंदर बागवान स्वावलंबन सिद्ध सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सासवड येथील वृत्तपत्र विक्रेते शकिल सिकंदर बागवान वय 46 वर्ष यांची जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वासाची कहाणी नक्कीच प्रेरणादायक आहे, जन्मजात पोलिओ ग्रस्त असलेला पाय आणि त्यातच अपघातात त्यांचा पायात रोड बसलेला असतानाही, गेल्या 19 वर्षापासून त्यांनी सासवड मध्ये वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय यशस्वीपणे जपलेला आहे, बागवान यांनी केवळ स्वतःच्या पायावर उभे राहून ,स्वावलंबन सिद्ध केले नाही, तर समाजासाठी आदर्श ही उभा केला आहे ,शकील बागवान यांचा बालपणीचा काळ अत्यंत, आव्हानात्मक होता, वयाच्या बारा वर्षापर्यंत त्यांना चालता येत नव्हते, त्याची आई त्यांना दर महिन्याला पुण्यातील कमान हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी एस टी बस ने घेऊन जायची तर वडील रोज संध्याकाळी त्यांना कडेवर घेऊन गावात फिरून आणायचे, या अथक प्रयत्नातून त्यांना पांगुळ गाड्यांच्या मदतीने चालायला जमले, वृत्तपत्र विक्रीतून स्थिरस्थावर अपंगत्वामुळे त्यांना कुठेही काम मिळत नव्हते, कुटुंबाची गरज भागवण्यासाठी त्यांनी येवलेवाडी फूट सॅलिट कंपनीत वर्षभर काम केले ,मात्र तेथे पाण्यातून पाय घसरण्याची भीती असल्याने, ते काम सोडून सासवडला परतले, आणि वृत्तपत्र विक्रीला सुरुवात त्यांनी केली, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते शिवाजी कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा व्यवसाय सुरू केला, गेली 19 वर्ष ते हा व्यवसाय सांभाळत आहेत, स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यावर सुरुवातीला आठ महिने त्यांनी पायी जाऊन, घरोघरी वृत्तपत्रे टाकली ,शारीरिक मर्यादा असतानाही त्यांनी काम सोडले नाही ,त्यांच्या या जिद्दीची दखल घेत माजी आमदार संजय जगताप आणि राजवर्धिनी जगताप यांच्या माध्यमातून ग्रामीण सं स्थेतर्फे त्यांना दिव्यांग यासाठीची मोटार मोफत मिळाली आणि हाच त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरला, तसेच अजून त्यांचे घराच्या स्वरूपातून एक काम त्यांचे स्वप्नातले राहिलेले आहे, ते काम पूर्ण करण्याकरता एक पत्रकार पुरंदर तालुक्यातील त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे यांच्या माध्यमातून घराची कुळ कायद्याचे काम हे आपले 100% पत्रकार पूर्ण करेल, असा विश्वास स्वत :शकिल सिकंदर बागवान यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments