Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील जेजुरी या ठिकाणी 12,333 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला; तर नगर परिषदेसाठी झाले 78.06 टक्के मतदान जेजुरी प्रतिनिधी: मयूर कुदळे जेजुरी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी दि. 2 रोजी मतदान झाले, नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 20 केंद्रावर 78.06% मतदान झाले, शांततेत मतदानाची परंपरा मतदारांनी चालू ठेवली, मागील निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावेळी मताची टक्केवारी कमी झाली असून, एकूण 12,333 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जेजुरी नगरपरिषद निवडणुकीमध्ये एकूण मतदान 25,800 होते यापैकी 12,333 एवढे मतदान झाले,महिला मतदान 8,215पैकी मतदारानी 6,436 आणि पुरुष 7,583 मतदारापैकी 5,895 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 86 टक्के मतदान झाले होते, यंदा ही टक्केवारी घसरली आहे, तृतीय पंथी दोन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग दोन मधील एकमधील शासकीय तांत्रिक विद्यालयात सर्वात जास्त 84.05% मतदान नोंदले गेले, नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत असून, तर नगरसेवक पदासाठी काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी व चौरंगी लढत होत आहे. मागील निवडणुकीमध्ये ८६ टक्के मतदान झाले होते, तर यावेळी निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली असून, मयत अथवा बाहेर गावच्या मतदारांची अनु स्थितीमुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याची बोलले जात आहे. दुपारनंतर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या, सायंकाळी मतदान वेळ संपेपर्यंत रांगा लावून मतदान करीत होते, निवडणूक निरीक्षक आरती भोसले व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केंद्रांना भेटी दिल्या, शांततेत मतदानाची परंपरा जेजुरी करांनी यावेळी कायम ठेवली, मतदारांना प्रभावित करण्यासाठी 'अर्थकारण' झाल्याची चर्चा अनेक ठिकाणी सुरू होती, भाव ठरवून मतदारांना आकर्षित केले जात होते, त्यामुळे मोठी आर्थिक,उलाढाल झाल्याचेही चर्चा ऐकायला मिळत आहेत, साधारणपणे सायंकाळी 78.06% मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शितल मुळे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चेतन कोंडे यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments