Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेसाठी 22,557 मतदारांनी बजावला हक्क; नगर परिषदेसाठी झाले मतदान 67.2% तर सासवड शहरामध्ये उत्साहात व शांततेत मतदान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासह, 20 नगरसेवकांच्या जागांसाठी मंगळवारी दि. 2 रोजी मतदान पार पडले. यावेळी शहरातील सकाळी मतदानास सुरुवात झाली असताना, 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये पुरुष मतदान 4,523 महिला 3,654 एकूण 8,177 टक्केवारी 24.29%. 7:30 ते 1:30 पुरुष मतदान 6, 861 महिला 6,562 एकूण 13,423 टक्केवारी 39.88%. 7:30 ते 3:30 पुरुष मतदान 9,215 महिला 9,053 एकूण 18, 268 टक्केवारी 54.27% 7:30 ते 5:30 पुरुष मतदान 11,412 महिला 11,145 एकूण 22, 557 टक्केवारी 67.2% टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सतिश थेटे यांनी दिली. सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 16,818 पुरुष तर 16,838 महिला असे असून एकूण 33 हजार 656 मतदार असल्याने, एकूण 22 हजार 557 मतदारांनी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य अधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी ही माहिती दिली. सासवड नगराध्यक्ष पदासाठी आनंदी (काकी) चंदुकाका जगताप (भाजप) सचिन सुरेश भोंगळे शिवसेना (शिंदे गट) अभिजीत मधुकर जगताप महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गट आणि निकिता राजेंद्र धोत्रे अपक्ष हे चार उमेदवार रिंगणात आहेत, तर प्रामुख्याने भाजप विरुद्ध शिवसेना( शिंदे गट )यांच्यातच मुख्य लढत होणार आहे, तर नगरसेवकाच्या 20 जागांसाठी भाजप शिवसेना व अपक्षासह 47 उमेदवार रिंगणात आहेत, यामध्ये मुख्य भाजप आणि शिवसेना शिंदे गटातच खरी लढत होणार आहे, एकूण 11 प्रभागांमध्ये मतदान झाले आहे, प्रभाग चार ब ची निवडणूक बिनविरोध झाली आहे, अस्मिता सुहास जगताप यांची नगरसेविका म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे, तर प्रभाग क्रमांक 11 अ न्यायप्रविष्ट असल्याकारणाने, हेमलता मिलिंद इनाम के या उमेदवारांची न्यायप्रविष्ट स्थिती असल्यामुळे, २० डिसेंबर रोजी निवडणूक लागण्याची सासवड नगर परिषदेची शक्यता आहे. वृद्ध, दिव्यांग आणि प्रथमच मतदान करणाऱ्या नवोदित मतदारांची उपस्थिती प्रशासनीय होती, या मतदारांची गुलाबपुष्प देऊन, स्वागत करण्यात आले दिव्यांग आणि वृद्धासाठी रिक्षा तसेच मतदान केंद्रावर सोयी साठी सेवकांची व्यवस्था ही केली होती, मतदान केंद्रावर चहा, नाश्त्याची आणि सावलीची, ही मांडवाची व्यवस्था करण्यात आलेली होती, प्रत्येक ठिकाणी केंद्राच्या आवारामध्ये कुठेही गर्दी किंवा बेशिस्तपणा जाणवलेला नाही,; सासवडमध्ये कोणताही केंद्र संविधीनशील नसतानाही एक उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, 110 पोलीस शिपाई व होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे एक युनिट, सहा पथके तैनात होती, बहुतेक केंद्रावर सीसीटीव्हीची ही व्यवस्था होती, दरम्यान वाघीरे हायस्कूल मध्ये मतदान अपूर्वीच बिघाड झालेली यंत्र ताबडतोब बदलण्यात आले, आधी कर्तव्य, मग चढला बहुल्यावर लग्नाच्या तिथी मुळे अनेक लग्न सोहळे असल्याने, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घाई केली होती, तर नवरदेव केदार संभाजी जगताप यांनी सकाळी लवकर आपला मतदानाचा हक्क बजावला, परंतु सासवड नगरपरिषद निवडणुकीमध्ये नियोजनाचा अभाव, शिक्षक, कर्मचारी वर्गामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचारी यांच्यात नियोजनावरून, बाचाबाची, निवडणूक साहित्य जमा करून घेणे व कर्मचारी मानधन वाट पाहत निवडणूक अधिकारी यांचा भोंगळ कारभार, सासवड नगर परिषदेमध्ये दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये उन्हाचे प्रमाण कमी होत असल्याकारणाने मतदार हा सासवडमधील मोठ्या प्रमाणात संख्येने घराबाहेर आली व मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान सासवड नगरपरिषद ही काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता ,परंतु काही काळामध्ये काँग्रेस मधून भाजपमध्ये दाखल झालेले संजय जगताप व शिवसेनेचे विद्यमान (शिंदे गटाचे) आमदार विजय शिवतारे यांच्यातच मुख्य लढत सासवड नगर परिषदेमध्ये दिसत आहे, याबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्सुकता शिगेला पोचलेली आहे निवडणूक प्रक्रिया संदर्भात नक्की कोण बाजी मारणार हे 21 डिसेंबर रोजी रविवार या दिवशी चित्र सपष्ट होईल.

Post a Comment

0 Comments