Hot Posts

6/recent/ticker-posts

एस .जी. आर. एस साबळे कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात सायबर सुरक्षेवर विशेष कार्यक्रम..... सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पीडीईएचे एस. जी. आर. एस साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड येथे क्विक हिल फाउंडेशन आणि  अण्णासाहेब मगर महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'सायबर सुरक्षा' या विषयावर एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ' अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील सायबर वॉरियर्स' च्या  टीमने विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सायबर सुरक्षेबद्दल अत्यंत मोलाची माहिती दिली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील संगणक शास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. विलास वाणी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर विलास वाणी यांनी केले. आणि मा. प्राचार्यांनी सायबर सुरक्षा आणि डिजिटल व्यवहार कसे करावे याचे सर्वांना मार्गदर्शन केले.'सायबर वॉरियर्स' टीमने डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन साधनांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी ऑनलाइन फसवणूक (fraud) टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांवर भर दिला. यामध्ये सुरक्षित पासवर्ड कसा तयार करावा, संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे कसे टाळावे आणि आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण कसे करावे यांसारख्या विषयांवर उपयुक्त माहिती देण्यात आली.या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांकडून, शिक्षकांकडून आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून "Antifraud" हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेण्यात आले. या ॲप्लिकेशनमुळे ऑनलाइन व्यवहारांदरम्यान संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित राहण्यास मदत मिळेल.हा मार्गदर्शन कार्यक्रम सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाइन सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. या माहितीमुळे महाविद्यालयातील प्रत्येक व्यक्तीला सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास निश्चितच मदत होईल.  सदर कार्यक्रम घेण्यासाठी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी प्रा. राजेश मोरे, प्रा. मनिषा गाडेकर, तसेच पूजा पेटकर , ढवळे सर , व सर्व शिक्षक वर्ग हे सर्व मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सायबर सुरक्षा कार्यक्रमाचे समन्वयक  प्रा. मनीषा गाडेकर यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.राजश्री चव्हाण, उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच सर्व  'सायबर वॉरियर्स' च्या टीमचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments