पुरंदर तालुक्यातील सासवड येथील चागावटेश्वर मंदिरात महाप्रसादाचे वाटप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक श्रावण मास समाप्ती निमित्ताने चांगावटेश्वर देवस्थान सासवड ता. पुरंदर येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते, सकाळी देवस्थानच्या वतीने पुजारी अजय बनसोडकर यांनी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घातला, उद्योजक नितीन साबळे, माजी कृषी राज्यमंत्री दादासो जाधवराव यांनी वर्षापूर्वीपासून सुरू असलेला श्रावण मास समाप्ती महाप्रसादाला सुरुवात केली. आज समारोपसाठी स्वतः जाधवराव उपस्थित होते. सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संजय चव्हाण, दिपक फराटे, सुरेश गिरमे यांनी दुपारी महाआरती केली. यावेळी माजी आमदार संजय जगताप, भाजपचे युवा नेते बाबा राजे जाधवराव, प्रकाश खाडे ,रमेश जगताप, दिपक टकले, प्रवीण पवार, मंगला म्हेत्रे, सुजाता गुरव, संदीप टिळेकर, प्रकाश शेडगे, किशोर महाजन, विक्रांत डोंगरे, गणेश जगताप, प्रदीप जगताप, परशुराम देशमुख, मोहन चव्हाण, आप्पासाहेब भांडवलकर, राजेंद्र धोत्रे, मंगेश गायकवाड, प्रवीण पवार, अमोल जगताप, अनिल गद्रे, आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments