Hot Posts

6/recent/ticker-posts

कोडीत नं.१ शाळेतील शिवम बडधे या विद्यार्थ्याला नासा संस्थेला भेट देण्याची संधी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडीत नं.१ या शाळेतील शिवम संतोष बडधे या विद्यार्थ्याला नासा या संस्थेस भेट देण्याची संधी मिळाली आहे. जिल्हा परिषद पुणे अंतर्गत इस्रो आणि नासा या अंतराळ संशोधन संस्थांना भेट देणे हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन टप्प्यात चाचणी परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी एक लेखी परीक्षा दुसरी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. १६००० विद्यार्थ्यांमधून २३५ विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले होते. या विद्यार्थ्यांची दि. ६ ते ८ ऑगस्ट या दरम्यान आयुका या संस्थेमध्ये मुलाखत घेण्यात आली. त्यामध्ये कोडीत शाळेचा विद्यार्थी पात्र झाला असून, त्याला नासा या संस्थेला भेट देण्याची संधी मिळाली आहे. त्यानिमित्त शिवम संतोष बडधे कोडीत नं.१ या शाळेचे मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक वर्गशिक्षक लतीफ कोंडीबा इनामदार,पालक संतोष अनंता बडधे आणि सुषमा संतोष बडधे यांचा सन्मान करण्यासाठी ग्रामपंचायत कोडीत बुद्रुकचे सरपंच रंजना खुटवड, माजी उपसरपंच प्रमोद बडधे, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानचे विश्वस्त सचिन बडधे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अमोल बडधे, पालक संजीव बडधे, मोनिका जरांडे, अश्विनी आहेरकर, आदर्श शिक्षक शिवाजी शितोळे,संजय कुंभारकर,संजय जाधव, रेणुका मस्के, कोडीत नं.२ च्या मुख्याध्यापक सुरेखा कामथे,आदर्श शिक्षिका प्रतिभा बोत्रे, सविता शितोळे,रहिमत शेख हे शिक्षकवृंद उपस्थित होते. सन २०२३/२४ चा शिष्यवृत्तीधारक शिवम संतोष बडधे यास पुरंदर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल , विस्तार अधिकारी धनाजी नाझीरकर, केंद्रप्रमुख गणेश मेमाणे यांनी त्याच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.बातमी सोबत फोटो पाठवीत आहे.फोटो ओळी - कोडीत नं.१ (ता.पुरंदर) शाळेतील नासा या संस्थेस भेट देण्याची संधी मिळालेल्या शिवम बडदे या विद्यार्थ्यां समवेत मार्गदर्शक मुख्याध्यापक लतीफ इनामदार व शिक्षक वृंद

Post a Comment

0 Comments