Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी काळूराम किसन हंबीर यांची बिनविरोध निवड सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पिंपरी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदी काळूराम किसन हंबीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, येथील माजी सरपंच हरिश शेंडकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे, त्यामुळे या पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्याच सरपंच पदासाठी हंबीर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी शिवरी मंडल चे बी. एन. देवकर यांनी ग्राम विकास अधिकारी अमित जाधव यांच्या उपस्थितीमध्ये काळुराम हंबीर यांची सरपंच पदी बिनविरोध निवड केल्याची घोषणा केली. यावेळी आमदार विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, उपसरपंच अनिता शेंडकर, सदस्य दिलीप शेंडकर, हरिश शेंडकर, योगिता थेऊरकर ,मनस्वी शेड कर, मोहिनी हंबीर, यांच्यासह जालिंदर कामठे, विजय कोलते, रमेश इंगळे, एडवोकेट शिवाजी कोलते, गणेश मुळीक, अतुल मस्के, युवासेना जिल्हा प्रमुख तुषार हंबीर, युवा सेना जेजुरी शहर प्रमुख ओंकार जाधव, सुरज बांदल, सुजित पवार, अर्जुन कापरे, पांडुरंग देवकर, महादेव शेंडकर, कविता शेंडकर, विकास हंबीर, शंभू हंबीर आणि पोलीस निरीक्षक प्रमोद हंबीर, भुजंग मुळीक, प्रकाश मुळीक, सागर मुळीक, पत्रकार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर काळूराम हंबीर मनाले की, आमदार विजय शिवतारे व ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय योजना व निधी आणून, पिंपरी ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी ही प्रतिनिधीला माहिती दिली.

Post a Comment

0 Comments