भूसंपादन क्षेत्रामध्ये 40 टक्क्यांनी कपात; तर पुरंदर विमानतळ ग्रामस्थांकडून संमती पत्र घेण्यास सुरुवात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाचे क्षेत्र कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, त्यानुसार आता केवळ 1285 हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे. सात गावांमध्ये नियोजित भूसंपादनाच्या क्षेत्रात 40 टक्क्याहून अधिक कपात करण्यात आली असून, त्यामध्ये उदाची वाडी, मुंजवडी येथील सर्वात कमी क्षेत्र भूसंपादन होणार असल्याचे समजत आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाची वाडी, कुंभार वळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र 2673 हेक्टर होते, सात गावांपैकी सर्वाधिक क्षेत्र हे पारगाव मधील संपादित होणार होते, या गावांमधील 1542 सर्वे नंबर मधील 972 हेक्टर जागा संपादित करण्यात येणार होती, त्या खालोखाल खानवडी गावातील 381 सर्वे नंबर मधील 451 हेक्टर जागा कुंभारवळण मधील 424 सर्वे नंबर मधील बाधित होऊन 341 हेक्टर क्षेत्राचे संपादन होणार होते ,तर वनपुरी गावातील 362 सर्वे नंबर मधील बाधित होऊन 330 हेक्टर जमीन उदाची वाडी मधील 199 सर्वे नंबर मधील 240 हेक्टर जमीन एखतपूर मधील 145 सर्वे नंबर मधील बाधित आणि 214 हेक्टर आणि मुंजवडी मधील 221 सर्वे नंबर मधील 122 हेक्टर जमीन संपादित केली जाणार होती, मात्र शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन, शासनाने भूसंपादन क्षेत्रात 1388 हेक्टर ची कपात करून, 1285 हेक्टर क्षेत्राचे संपादन करण्याचा निर्णय घेतला आहे ,गावनिहायक्षेत्र असे बागायती जमीन असल्याने, शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध होता, हे विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने नव्याने आराखडा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे दिला होता, त्यानुसार भूसंपादन क्षेत्रात कपात करताना, बागायती जमीन वगळण्यात आली तसेच या सातही गावांमधील गावठाण या आराखड्यातून, वगळण्यात आले आहे, त्यामुळे गावनिहायक्षेत्र कमी झाल्याचे आता एखतपुर मधील201 हेक्टर, खानवडी मधील 266 ,कुंभारवळण मधील 255, मुंजवडीतील 77, पारगाव मधील 188, उदाचीवाडी मधील 45 तर वनपुरीतील 175 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन निश्चित करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments