Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील दिवे या ठिकाणी तळ्यात बुडून एकाचा मृत्यू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज दिवे (ता. पुरंदर) येथील तळ्यात एकाचा बुढून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 24) रोजी घडली. अक्षय मुरलीधर खरात रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर असे बुढून मृत्यू झालेले चे नाव आहे. याबाबत आदर्श किशोर पालखे रा. महादेव नगर हडपसर पुणे जाधव याबाबत सासवड पोलीस स्टेशनमध्ये ही माहिती दिली. अक्षय खरात हा तळ्यात बुडाल्याचे कळताच सासवडचे उपसहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस दत्तात्रय शेगर, सुनील पवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले, तेथे चौकशी केली असता, अक्षय खरात हा पाण्यात बुडाल्याचे स्पष्ट झाले, पोलिसांनी भोरच्या भोईराज जल आपत्ती संघाचे अध्यक्ष उमाकांत तुकाराम गुजर यांनी याबाबत माहिती दिली की, गुजर यांनी सहकार्यासह घटनास्थळी पोहोचून पाण्यात शोध घेतला असता, त्यांना सोमवारी दि. 24 रोजी दुपारी 12:10 मिनिटांनी अक्षयचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह सासवड ग्रामीण रुग्णालयांमध्ये पाठवला.

Post a Comment

0 Comments