Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांची केंजळगड ते रायरेश्वर पदभ्रमंती सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज शिवकार्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी “सफर बारा मावळची” पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या वर्षीच्या पहिल्या मोहिमेत नामदेव गंगाराम शिंगाडे महाविद्यालयातील ५५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.सह्याद्रीच्या कुशीत वसलेले दोन वैभवशाली किल्ले – केंजळगड व रायरेश्वर – या दुर्गांची निवड करण्यात आली. रायरेश्वरच्या भूमीवरच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती, त्यामुळे या ऐतिहासिक स्थळांना भेट देणे विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी व आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरला.या उपक्रमामध्ये शिवकार्य प्रतिष्ठानचे पुरंदर विभागप्रमुख आकाश चौधरी यांचे नेतृत्व लाभले. त्यांना १० स्वयंसेवकांची साथ, तसेच मार्गदर्शक म्हणून समीर खेडेकर व राजेश खेडेकर यांचे सहकार्य लाभले. मोहिमेच्या यशात त्यांचा मोठा वाटा राहिला.शिवकार्य प्रतिष्ठानचा मुख्य हेतू म्हणजे –- इतिहास हा केवळ पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकविणे.- तरुण पिढीला गडकिल्ल्यांचा इतिहास, संस्कृती व भौगोलिक पैलू समजावून सांगणे.- “स्वराज्याचा वारसा पुढील पिढीकडे सोपविणे” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे.या पदभ्रमंतीत विद्यार्थ्यांनी रायरेश्वरवर बसून शिवाजी महाराजांच्या शपथेची गाथा अनुभवली. महाराज आणि मावळ्यांमधील नात्याचा आत्मीय स्पर्श त्यांनी प्रत्यक्ष जाणला.आगामी दोन वर्षे ही मोहीम सातत्याने राबविण्यात येईल व त्यामध्ये विद्यार्थ्यांना बारा मावळ व तेथील गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक आणि भौगोलिक ठेवा प्रत्यक्ष अनुभवता येईल, असे आश्वासन पुरंदर विभागप्रमुख आकाश चौधरी यांनी दिले.या वेळी कार्यक्रमाला नामदेव गंगाराम शिंगाडे विद्यालयाचे शिक्षक सागर कोकाटे तसेच शिवकार्य प्रतिष्ठानचे साजन मुसळे, स्वप्नील पाटोळे, समीर साठे, चेतन पाटील, राज दातार, कृष्णा खेडेकर, सार्थक लवांडे, प्रज्वल खेडेकर, आर्यन खेडेकर उपस्थित होते.“गडकोटांचा इतिहास जाणून घेतला, तरच स्वराज्याचा वारसा जपता येईल."हीच प्रेरणा घेऊन सफर बारा मावळची मोहिम पुढे चालू राहणार आहे. असे मत राजेश खेडेकर यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments