पुरंदर तालुक्यातील सासवडच्या मूलभूत सोयीसाठी जर निधी न मिळाल्यास येथून, पुढे गाव बंद आंदोलन करू; भाजपाचे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप सासवड प्रतिनिधी: सुमारे तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट असलेल्या, सासवड नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावर, नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावठाण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या, तुंबलेली गटार वाहिनी, बंद पथदिवे आणि खराब रस्त्यामुळे नागरिक तर हैराण झालेले आहेत. याच मुद्द्यावरून सोमवार दि. 11 रोजी माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना घेराव घातला, एकीकडे सलग सहा वर्ष स्वच्छ सर्वेक्षण अभियानात, अव्वल राहण्याचा मान मिळवणाऱ्या सासवड मध्ये सध्या स्वच्छतेचे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे, अनेक ठिकाणी गटार वाहिन्यांचे पाणी रस्त्यावर वाहत आहे, घंटा गाड्या वेळेवर येत नाहीत, तर जुन्या जलवाहिन्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या गटारीचे पाणी मिसळून, दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी भरपूर नागरिकांनी केलेल्या आहेत, शहरात कुठेही भाजी विक्रेते बसतात, डुकरे आणि भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे, उद्याने बंद आहेत आणि महत्त्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक नाहीत, अशा अनेक प्रकारच्या समस्या मांडलेल्या नागरिकांच्या यावर रोज लक्षात घेता मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या निधीच्या प्रस्तावाचा पुन्हा नव्याने पाठपुरावा करण्याची आश्वासन दिले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगर विकास मंत्री यांनी आमच्या या रागामुळे सासवडकर नागरिकांना वेठीस धरू नये,सासवडचे नाव बदनाम करण्यासाठी प्रशासन जाणून-बुजून विकास कामांमध्ये अडथळे आणत आहे, मुख्याधिकारी निधी नसल्याचे कारण देत आहेत, त्यामुळे शहरातील गणेश मंडळ आणि नागरिक स्वत: पुढाकार घेऊन, गावचा कारभार चालवतील, आठ दिवसात रस्ते, पाणी गटार वाहिनी आणि पथदिव्यांची कामे जर झाली नाही, तर 19 ऑगस्टला गाव बंद आंदोलन करू, असेही मत पुरंदरचे हवेलीचे माजी आमदार व भाजपचे नेते संजय चंदूकाका जगताप यांनी व्यक्त केले. यावेळी साकेत जगताप, शहराध्यक्ष आनंद जगताप, संतोष जगताप, जयेंद्र निकम, मयूर जगताप, मंदार टिळेकर, यशवंतराव जगताप, संजय चव्हाण, अजित जगताप, मनोहर जगताप, सोपान रणपिसे, राजन जगताप, मोहन शिंदे, सागर जगताप, विजय जगताप, विरेश दहिवाल, वैभव जगताप, महादेव भोडे, राजेंद्र गिरमे, सागर जगताप, तुषार बंटी जगताप व अनेक युवक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments