Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यात दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलीसानी आयोजकांची बैठक घेतली सासवड प्रतिनिधी: दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर( बुधवारी दि.13) सासवड नगरपरिषदेच्या सभागृहांमध्ये सासवड पोलिसांनी गणेशोत्सव आणि दहीहंडी मंडळाच्या आयोजकासाठी बैठक घेतली, यामध्ये उत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला पोलीस, पालिका प्रशासन आणि महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांनी मंडळांना उत्सवा दरम्यान, वाहतूक कोंडी टालणे, ध्वनी मर्यादेचे पालन करणे, बॅनर ची योग्य व्यवस्था करणे, आणि मिरवणूक किती देखाव्याची, उंची 16 फुटापर्यंत ठेवणे या प्रकारच्या सूचना दिल्या. तसेच लेझर लाईटचा वापर करू नहे, प्रत्येक मंडळाने पोलीस ठाण्यात अर्ज करावा आणि विद्युत पुरवठ्यासाठी महावितरण कडे अर्ज करून, मीटर घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले. दहीहंडीच्या वेळी गोविंदा पथकासाठी सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, कारण 14 वर्षाखालील मुलांचा सहभाग टाळणे, हे गरजेचे असून त्या प्रकारच्या सुद्धा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्तीचे स्टॉल रस्त्यावर न लावता, मोकळ्या जागेत लावणे, मिरवणूक मार्गावरील विजेच्या तारा किमान वीस फुटापर्यंत उंच करणे, आणि झाडाच्या फांद्या छाटणी या प्रमुख मागण्या होत्या, पारंपारिक वादयावर वेळेचे बंधन असावे, दहीहंडीच्या दिवशी महामार्गावर वाहतूक व्यवस्था करावी आणि चांगले देखावे सादर करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन पर बक्षीस दिले जाईल, अशाही सूचना करण्यात आल्या. बैठकीला गुप्तवार्ताचे रुपेश भगत, पालिकेचे अभियंता जावेद मुल्ला, महावितरणचे सहाय्यक अभियंता सोमनाथ शिंदे, सुनील कामठे यांच्यासह अनेक मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील, महिला दक्षता समितीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments