Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सिंगापूर ची साई हायटेक नर्सरी उत्कृष्ट उत्पादक म्हणून गौरव सासवड प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघातर्फे पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील साई हायटेक नर्सरीला राष्ट्रीय शेअर बाजार बीकेसी बांद्रा मुंबई येथे उत्कृष्ट आंबा उत्पादक म्हणून गौरव करण्यात आला. विविध दर्जेदार आंब्याच्या वरायटीची लागवड व नवनवीन प्रयोगशील शेती पद्धती स्वीकारल्याबद्दल नर्सरीचे संजय कोरडे यांना प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. सन्मानामुळे साई हायटेक नर्सरीच्या कार्यास नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली असून, अधिक दर्जेदार व निरक्षम आंबा उत्पादन घेण्यासाठी हे सन्मानचिन्ह उर्जा देणारे ठरले असून, असे मत संजय कोरडे यांनी एक प्रकारे व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल, प्रल्हाद वरे, कल्याण काटे, तानाजी हरपळे, अजय चौधरी, दिलीप जाधव कार्यकारिणीचे मनापासून आभार मानले.

Post a Comment

0 Comments