Hot Posts

6/recent/ticker-posts

विविध संस्थांच्या माध्यमातून सासवडच्या परिसरात एक दिवसात दिड हजार झाडांची लागवड... .सासवड प्रतिनिधी: १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलासासवड येथील वाघ डोंगर परिसरात विविध सेवाभावी संस्था, शाळा महाविद्यालय, नगरपालिका यांच्या एकत्रित सहभागातून एका दिवसांत सुमारे दीड हजार जंगली झाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरण जनजागृती करण्यात आली. सासवड नगरपालिका, शेठ गोविंद रघुनाथ साबळे फार्मसी कॉलेज, शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल,गुरुकुलविद्यालय, नगर पालिका शिक्षण मंडळ, राष्ट्रसेवा दल, स्व एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान, सृष्टी फाऊंडेशन,छत्रपतीशिवाजी महाराज वनश्री संस्था, पर्यावरण रक्षिता फाऊंडेशन या सर्व संस्थेचे कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. तिरंगा ध्वज फडकवत, वृक्षांची पूजा करून याचा शुभारंभ करण्यात आला सुमारे सव्वा एकर क्षेत्रावर ही लागवड करण्यात येत असून सर्व जमीन पंधरा दिवसांच्या मेहनतीनंतर लागवडीयोग्य करण्यात आली आहे. घनवन तसेच जपानी मेवाकी पद्धत या ठिकाणी वापरण्यात येणार असुन लागवड केलेल्या झाडांसाठी ड्रिप पद्धतीने पाणी पुरवठा व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. सासवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण, फार्मसी कॉलेजच्या डॉ राजश्री चव्हाण, वाघीरे विद्यालयाचे शंतनु सुरवसे गुरुकुलचे विजय हाके, स्व एकनाथकाका प्रतिष्ठानचे संतोष जगताप, फाऊंडेशनचे शंकर बनसोडे, सेवानिवृत्त अधिकारी मोहन चव्हाण,जेष्ठ पत्रकार हेमंत ताकवले, शिवाजी राजीवडे, प्रकाश जगताप, पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments