भक्तीसंध्या गायन,कला वाद्य कार्यक्रमाने बेलसरकर मंत्रमुग्ध सासवड प्रतिनिधी: बेलसर(ता.पुरंदर)येथे श्रावण महिन्याच्या औचित्याने गावच्या विठ्ठल मंदिरामध्ये भक्तीसंध्या या अभंग व भक्तीगीतेचा सुरेख संगम असणाऱ्या नाविन्यपूर्ण, आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी संपूर्ण मंदिर परिसर भक्ती रसाने रंगून गेला होता. गावचे सुपुत्र,पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी नितीन जगताप व रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले गुलाब बुधे यांचे संकल्पनेतून व बेलसर ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच अर्जुन धेंडे, निलेश जगताप,संभाजी गरुड,कैलास जगताप,वनिता जगताप,विलास जगताप,विलास गरुड,संजय गरुड,मामासो गरुड,संतोष जगताप,धीरज जगताप,रोहिदास जगताप, सुहास जगताप,सुधाकर टांकसाळे,शिवाजी झुरंगे,राजेंद्र जगताप,अनिल रासकर,मुख्याध्यापक सावने,भीमराव कदम, विलास दुर्गाडे,पंडित मुकुंद मराठे,आकाशवाणी दूरदर्शन गायक पुणे यांचे शिष्यवर्ग,पुरंदर कला मंच सासवडचे सदस्य व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमात गुलाब बुधे यांनी "राम कृष्ण हरी",मच्छिंद्र दीक्षित व सुवर्ण होले- नाळे यांनी "रूप पाहता लोचनी","सुंदर ते ध्यान" हे अभंग सादर केले तर पोलीस अधिकारी नितीन जगताप यांनी कलावती रागात "ज्ञानियांचा राजा गुरु महाराज", कानडा राजा पंढरीचा यासारखे अभंग सादर करून रंगत आणली यावेळी विठ्ठल नामाचागजर करत श्रोत्यांनी दाद दिली.तर संगीत विशारद स्वरा दीक्षित,तबलावादक राजेंद्र दूरकर,हार्मोनियम वादक उदय शहापूरकर,तबला विशारद रोहित अडसूळ,कु.स्वप्निल जगताप,पखवाज वादक चंदुलाल तांबोळी यांनी साथसंगत करून कलाविष्कारांची उंची वाढवली. जिल्हा परिषद शाळा बेलसर,मठवाडी व बालसिद्धनाथ विद्यालय बेलसर यांच्या विद्यार्थ्यांनी शोधीशी मानवा राउळी मंदिरी,देवाक काळजी रे,हर करम आपणा करेंगे ही नयन मनोहर अशी गीते सादर केली. "शिवछत्रपतींच्या संकल्पनेतील स्वराज्याची पहिली विजयी लढाई बेलसरला झाली तिथूनच मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि अखंड हिंदुस्तान भर शिवरायांचा भगवा फडकला तसंच पोलीस अधिकारी नितीन जगताप यांनी बेलसरच्या इतिहासामध्ये प्रथमच असा अलौकिक भक्तीसांप्रदायाचा गजर करणा-या भक्ती संध्या या संगीत गायनचे आयोजन करून बेलसरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला." निलेश जगताप,माजी सरपंच. याप्रसंगी बाळासाहेब फडतरे यांनी निवेदन केले तर निलेश जगताप यांनी सूत्रसंचालन,कैलास जगताप यांनी आभार मानले. फोटो ओळ:बेलसर येथे भक्तीसंध्या गायन,कला वाद्य कार्यक्रम सादर करताना..
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments