Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 शासकीय जयंती साजरी करणे यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सासवड प्रतिनिधी: आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 शासकीय जयंती जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य व समस्त ग्रामस्थ भिवडी यांच्या वतीने रविवार दि. 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:00 वाजता हुतात्मा उमाजी नाईक विद्यालय भिवडी ता. पुरंदर जिल्हा पुणे येथे साजरी करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह लाखो समाज बांधवांच्या उपस्थितीत जयंती सोहळा दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, यावर्षी तसा त्या पद्धतीने चांगला होणार आहे. सदर कार्यक्रमाकरिता कार्यक्रमात बाहेरील चौक, रस्ते यावर मान्यवरांची छोटे कट आउट, डिजिटल बॅनर, संघटना, पिवळे झेंडे, होर्डिंग, स्वागत कमानी लावण्यात येणार आहेत. तसेच लाईट, डेकोरेशन, मंडप साउंड सिस्टिम स्क्रीन स्ने भोजन आहे .सदर कार्यक्रमाकरिता वाहन पार्किंग व्यवस्था करणे, याबाबत रीतसर पद्धतीने पोलीस परवानगी घेण्याचे ठरवलेले आहे, त्यासाठी बंदोबस्त हा देण्यात येणार आहे, यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे पुरंदर तालुक्यातील राज्य पुणे जिल्हा व पदाधिकारी यांनी तालुक्यातील तहसीलदार पुरंदर श्री विक्रम राजपूत, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीमाळ, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण या सर्वांना भेटून सात सप्टेंबर रोजी भिवडी या ठिकाणी शासकीय जयंती साजरी होत आहे, त्यानिमित्त वरील चंद्रकांत भाऊ खोमणे राजे उमाजी नाईक सातवे वंशज, गंगाराम जाधव सर महाराष्ट्र राज्याचे कोर कमिटीचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे सल्लागार समितीचे अध्यक्ष व कातोबा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गणपत शितकल, जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार समितीचे उपाध्यक्ष व सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक बिट्टू तात्या भांडवलकर ,जय मल्हार क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष व माजी अध्यक्ष पुरंदर तालुका साहेबराव जाधव, जय मल्हार क्रांती संघटनेचे पुरंदर तालुका अध्यक्ष विकास शेठ उर्फ बल्ली भांडवलकर, स्वप्निल चव्हाण, जय मल्हार क्रांती संघटनेचे पुरंदर तालुका युवक उपाध्यक्ष योगेश पंढरीनाथ जाधव, युवा उद्योजक ओंकार जाधव, जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी निलेश चव्हाण एचडीएफसी बँक कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते किसन महाराज चव्हाण सामाजिक कार्यकर्ते अक्षय उर्फ चिकू शेठ भांडवलकर, युवा उद्योजक सासवड अमित खोमणे, सामाजिक कार्यकर्ते सासवड व पत्रकार बाप्पू मुळीक व पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख खंडू जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments