Hot Posts

6/recent/ticker-posts

नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या आदेशान्वये नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता कालबद्ध कार्यक्रम जाहीर सासवड प्रतिनिधी: सासवड नगरपरिषद क्षेत्राची प्रारूप प्रभाग रचना विहित कालमर्यादेत नगरपरिषद स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या प्रभाग रचना समितीमार्फत तयार करून, सदर प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी पुणे यांनी मुख्याधिकारी यांचेमार्फत नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना सादर करण्यात आलेला होता.मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशानुसार नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रारूप प्रभाग रचना प्रस्तावास मान्यता देण्याचे अधिकार संबंधित मा.विभागीय आयुक्त यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार सासवड नगरपरिषद प्रारूप प्रभाग रचना प्रस्तावास माननीय विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी मान्यता दिलेली आहे.प्रभाग रचनेच्या वेळापत्रकानुसार दिनांक 18 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रभाग रचना कार्यालयीन वेळेत नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध असेल, तसेच नगरपरिषद च्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. त्यावरील हरकती व सूचना नागरिकांनी हरकती व सूचना विहित वेळेत नोंदवाव्यात. इच्छुक नागरिकांनी आपली हरकती / सूचना नगरपरिषद कार्यालयातील आवक-जावक विभागामध्ये लेखी स्वरूपात सादर कराव्यात. हरकती व सूचना सादर केलेल्या नागरिकांना स्वतंत्रपणे सुनावणीसाठी वेळ देण्यात येऊन त्यांचे म्हणणे ऐकण्यात येईल. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा व सूचनांचा विचार केला जाणार नाही.अशी माहिती डॉ. कैलास चव्हाण मुख्याधिकारीसासवड नगरपरिषद यांनी दिली.

Post a Comment

0 Comments