पिसे येथील सप्ताहाची सांगता काल्याचे किर्तन; हरिभक्त परायण सतिश महाराज टिळेकर राहू यांच्या किर्तनाने झाली सासवड प्रतिनिधी: स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य गुरु शंखनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह 9 ऑगस्ट पासून ते 16 ऑगस्ट पर्यंत पिसे गावातील सप्ताह कमिटीने व भजनी मंडळ यांच्या सौजन्याने उत्कृष्ट सेवा पार पडली. भक्तीमय वातावरणात सात दिवस कसे पार पडले, याची जाणीव सुद्धा झाली नाही, यासाठी गावातील तरुण युवक, युवती, महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन, एक प्रकारे चांगलीच रंगत आणली. दैनंदिन कार्यक्रम, अखंड विना वादन, पहाटे काकडा आरती, ग्रंथ वाचन, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गाथा भजन, ग्रंथराज पारायण सोहळा, प्रवचन, हरिपाठ, हरी किर्तन, श्रीहरी जागर, प्रवचन ये नित्य नियमाने सात दिवस भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडले. तर 15 व 16 ऑगस्ट रोजी सतिश महाराज टिळेकर राहू यांचे दोन दिवस कीर्तन झाले, यामध्ये दोन दिवसात गावातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी किर्तनात 25 जणांचा उल्लेख केला होता, त्याला प्रतिसाद पाच तरुणांचा मिळाला, रोपटे लावले आहे,त्याचा वटवृक्ष पुढील काळात होईलच, गावातील युवक किर्तनात नक्की येणार, हे यावरून दिसून येते. त्यामुळे सर्व गावच भक्तिमय वातावरणात नाहून गेला आहे, महाराजांनी आपल्या किर्तनातून भरपूर उदाहरणे देऊन, गावकऱ्यांना मंत्रमुग्ध करून, हसून, प्रसन्न केले. यासाठी भजनी मंडळातील भानुदास मुळीक, रोहिदास मुळीक, पोपट गुळुंबे, रजनीकांत मुळीक, गोपीनाथ मुळीक, अर्जुन मुळीक, सुरेश मुळीक, विजय इंगळे, रमाकांत मुळीक, संतोष मुळीक, विणेकरी अशोक मुळीक, महिला निराबाई मुळीक, सुभद्रा मुळीक, अलका मुळीक, गंगुबाई मुळीक, रंजना मुळीक, भिमाबाई मुळीक, लिलाबाई सांगळे, गुणाबाई मुळीक, अंजना मुळीक, बेबी मुळीक, चंद्रभागा मुळीक, संगीता मुळीक, लता मुळीक, उज्वला मुळीक, अक्का बोरकर, विशेष म्हणजे निस्वार्थीपणे सेवा करणारे उत्कृष्ट सेवक म्हणजे संतोष सुरेश मुळीक यांनी जबाबदारीने गेली तीन वर्षापासून निर्वीघ्नपणे सेवा पार पाडीत असून, त्यांचे कौतुक करावे तेवढे खूप कमी आहे. फक्त ही सेवा शंखनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व श्रीनाथ म्हस्कोबाच्या आशीर्वादाने ही सेवा करत आहे, असे संतोष सुरेश मुळीक यांनी आपले मत व्यक्त केले. स्पीकर व्यवस्था श्रीकृष्ण साउंड सर्विस पिसे, पाणी सौजन्य श्रीनाथ एंटरप्राईजेस पिसे, यांच्याकडून देण्यात आले. महाप्रसादाचा लाभ समस्त ग्रामस्थ पिसेकर यांच्यातर्फे करण्यात आला. या वर्षी सप्ताह फंड 6 लाख 20 हजार रुपये तर फंड वाटप करून, त्यावरून मिळणारे व्याज 2 लाख 33 हजार 700 रुपये व्याज आहे, सभासद संख्या 31 आसून पुढील वर्षी रक्षाबंधन साठी फंड जमा करणे बंधनकारक आवश्यक आहे, त्यानंतर प्रतिदिन 500 रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती सप्ताह कमिटीच्या सदस्यांनी माहिती दिली. यासाठी विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, गावातील युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी बांधव यांनी भरभरून सात दिवस गावच्या अखंड हरिनाम सप्ताह साठी झटून काम केले आहे. महत्त्वाची भूमिका म्हणजे विद्यमान सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच, आजी-माजी सर्वांच्याच सहकार्यांमधून हा सप्ताह पिसे गावचा उत्कृष्टपणे पार पडला आहे, तर यासाठी राजपथ इन्फा कंपनीची सुध्दा मदत मिळाली आहेच पत्रकार बापू मुळीक याच्या माध्यमातून झाली आहे. पुढच्या वर्षी हा सप्ताह पूर्णपणे ऑनलाईन साठी, पूर्णपणे महाराष्ट्रात कसा जाईल याची स्थिती पुढच्या वर्षी 100% आखली जाईल, अशी माहिती सप्ताह कमिटीच्या सदस्यांनी दिली. तर पुढच्या वर्षी सप्ताह हा उत्कृष्टपणे व निर्विघ्नपणे चांगला पार पडेल, तसेच सप्ताह जमा, खर्च फंड वाटप 31सभासद यांची ताळेबंद यादी सवॅ लवकरच मिळेल अशी माहिती खजिनदार संतोष सुरेश मुळीक यांनी प्रतिनिधीला माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments