विद्यार्थ्यांना मिळाले बँक व्यवहाराचे धडे ... सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित माहूर माध्यमिक विद्यालय माहूर ता. पुरंदर जिल्हा पुणे या विद्यालयात आज संत सोपान काका सहकारी बँकेने विद्यालयात येऊन बँके मधील विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार कसे केले जातात याविषयी माहिती दिली . बँक आपल्या दारी या योजनेअंतर्गत 23जून 2025 पासून बँकेने संत सोपान काका पालखी प्रस्थान पासून हा उपक्रम सुरू केला असून या अंतर्गत आज विद्यालयात बँकेच्या आर्थिक व्यवहारांविषयी माहिती देत असताना बँकेचे कर्मचारी विठ्ठल बनकर म्हणाले , विद्यार्थ्यांनी बँकेत आल्यानंतर आपले खाते कसे सुरू करावे , बँक व्यवहार कसे करावेत , विविध खाते प्रकारा विषयी सांगताना बचत खाते , चालू खाते , चालू कर्ज खाते , याविषयी माहिती सांगितली .पैसे काढताना व भरताना च्या विविध स्लिपा कशा भराव्यात , चेक कसा भरावा , आपले स्वतःचे खाते कसे वापरावे , खातेदाराच्या सही विषयी , कागदपत्रांविषयी , कागदपत्र फेर तपासणीचे महत्त्व , आधार कार्ड वरील पत्ते व्यवस्थित असावेत ,आई-वडिलांचे नाव पत्ता , जन्मदिनांक व्यवस्थित असावा .इयत्ता दहावीचे फॉर्म भरताना विद्यार्थ्यांचे बँक खाते असणे बंधनकारक असते .त्याचप्रमाणे स्थानिक पत्ता व्यवस्थित असावा ,R.T.G S ,N F T त्याचप्रमाणे I MPS च्या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली . यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक रणजीत जगताप ,विठ्ठल बनकर , निलेश ढुमे , यश जगताप हे बँकेचे कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले . कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील विकास राऊत , इंद्रभान पठारे ,रामचंद्र जगताप , लता गायकवाड हे शिक्षक तर कर्मचारी रामभाऊ कुंभार ,मंगल जगताप , श्रीकांत खोमणे , श्रीकांत गव्हाणे हे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजन केले . कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र भोसले यांनी तर आभार पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष रामप्रभू पेटकर यांनी मानले .
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments