Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवडच्या अजय मंडळाचा बारामती विभागामध्ये प्रथम क्रमांक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड( ता. पुरंदर) येथील अजय गणेशोत्सव मंडळ यांचा ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल पुणे ग्रामीण बारामती विभागात प्रथम क्रमांक आला असून, बारामती येथे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल व अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन, अजय मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीण पवार, संजय उबाळे, संजय फडतरे, ओम पवार, कुणाल जगताप आदी उपस्थित होते. सासवडमध्ये बेवारस मृत व्यक्तींचा अंत्यविधी केले ,वीस वर्षापासून करण्यात येतो, सासवडमध्ये गरजू लोकांना 50 टक्के अनुदानावर आजपर्यंत मंडळांनी 50 शिलाई मशीन, 20 हातगाडी वाटप करण्यात आले आहे. संगमेश्वर मंदिर येथील कर्हा नदीतील गाळ काढून खोलीकरण केले, मंडळांनी अंध, मतिमंद शाळा मधील विद्यार्थ्यांना अष्टविनायक दर्शन, अशी विविध सामाजिक उपक्रम मंडळ वर्षभर राबवत असते, तसेच कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे पाळल्यामुळे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने मंडळाला पुरस्कार दिला असल्याचे, मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments