पुरंदर तालुक्यामध्ये क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा व सभागृह व्हावे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रज सरकार विरुद्ध पहिले बंड उमाजी नाईक यांनी केले, व देशासाठी फासावर गेले, त्याचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, ते भारताचे पहिले क्रांतिवीर आहेत, पुरंदर तालुक्यातील भिवडी ही त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने, त्यांच्या स्मृती व इतिहास जिवंत ठेवण्यासाठी, 7 सप्टेंबर शासकीय जयंती व 3 फेब्रुवारी पुण्यतिथी कार्यक्रमास महाराष्ट्रातून समाज बांधव, लाखोच्या संख्येने उपस्थित असतात, या अध्य क्रांतिवीरांच्या सासवड येथे पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या नावाने सभागृह असावे, असे पत्र माजी आमदार संजय जगताप यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी राज्य सल्लागार गणपत शितकल, वंशज चंद्रकांत खोमणे, उपाध्यक्ष यशवंत भांडवलकर, लालासो भंडलकर ,राज्य युवक उपाध्यक्ष साहेबराव जाधव, पुरंदर तालुका अध्यक्ष विकास भांडवलकर ,युवक अध्यक्ष अविनाश जाधव, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख खंडू जाधव ,अक्षय भांडवलकर, युवराज जाधव, उमेश जाधव, गणेश भांडवलकर, मनोज जाधव आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments