अपशब्द भडकावण्याच्या घोषणा करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करू: पोलीस निरीक्षक सासवड ऋषिकेश अधिकारी सासवड पोलिसातर्फे बैठक सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळाची बैठक घेण्यात आली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धवन्हीक्षेपकांचे नियम पाळणे, महिला व लहान मुलांसाठी स्वतंत्र रांगा ठेवणे, मिरवणुकीत भडकाऊ घोषणा करणाऱ्या अश्लील गाणी, समाज विघातक लोकांना प्रवेश नसावा, डीजे व लेजर लाईटचा वापर टाळून, पारंपारिक वाद्याचा वापर दिलेला सूचनांचे पालन न केल्यास, कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिला. बैठकीनंतर पोलीस गणेश महासंघ व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विसर्जन मार्गाची पाहणी करून, सूचना देण्यात आल्या. या बैठकीस आमदार विजय शिवतारे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसिलदार विक्रम राजपूत, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, महावितरणचे उपअभियंता गणेश चांदणे, मंडळाचे पदाधिकारी, सासवड आगार प्रमुख सागर गाडे, यासह सासवड शहरातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. पोलिसांनी मंडळांना प्रमुख सूचना देण्यात आलेल्या आहेत, मूर्ती व दागिनेच्या संरक्षणासाठी स्वयंसेवक सुरक्षा सुरक्षक नेमणे, वीज जोडणी व रोषणाई सुरक्षित असल्याचे महावितरण कडून प्रमाणपत्र घेणे, मंडळ आधी पदाधिकाऱ्याकडून नावे व मोबाईल नंबरची यादी दर्शनी भागात लावणे, अशा सूचनाही करण्यात आल्या, संपूर्ण सासवड शहर व ग्रामीण भागात मद्य, विक्री दुकाने बंद राहतील, विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्य विक्री दुकाने बंद ठेवावी, या काळात मध्य विक्री करताना, आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करा, गणेशोत्सव कार्यक्रम व गणेशाची विसर्जन मिरवणूक कार्यक्रम शांततेत व आनंददायी जावा, यासाठी गणेश मंडळातून चुका होऊ देऊ नका, नियमाचे काटेकोरपणे पालन करा ,याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी असे सांगितले. मिरवणुकीच्या रथाचा मार्गावर अडथळा होणार नाही, असा आकार असावा, मिरवणूक काळात महिला व वृद्धांना त्रास होईल, असे कोणतेही प्रकारचे वर्तन मंडळाकडून होऊ नये, रात्री बारानंतर मिरवणुकीचा कार्यक्रम थांबविला जाईल, याची दखल सर्वांनी घ्यावी, असे सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments