Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवडच्या शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणातफोडली पुस्तकांची दहीहंडी.. वंदे मातरम् चा उपक्रम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक वाचन संस्कृती वाढीला लागावी, मुलांनी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडावे, विचारांची देवाण घेवाण व्हावी या हेतूने सासवड येथील शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात पुस्तकांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. वंदे मातरम् संघटना, युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट व शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने आयोजित या उपक्रमास जेजुरी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त डॉ राजेंद्र खेडेकर, विश्वस्त ॲड विश्वास पानसे , वंदे मातरम् संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे, प्राचार्य रेणुका सिंग मर्चंट, इस्माईल सय्यद, डॉ बाळासाहेब भगत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मतेचा विचार देणाऱ्या या उपक्रमाचे भारत माता प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. गणेश भुजबळ यांनी प्रास्तविक केले तर सुशीलाबोरुडे व चित्रलेखा केसकर यांनी सूत्र संचालन केले . श्री शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुस्तके लावलेली दहीहंडी फोडून जल्लोष केला. आकर्षक वेशभूषा केलेल्या श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी, पावसाची हजेरी, झांज पथकांच्या निनादात, भगव्या निशाण धारण केलेल्या युवती, मच गया शोर सारी नगरी च्या तालावरफोडण्यात आलेली ही हंडी विशेष लक्षवेधी ठरली सचिन जामगे, डॉ राजेंद्र खेडेकर, ॲड विश्वास पानसे श्रीकांत पवार, बळवंत गरुड व मंगेश घोणे यांनी या वेळीमनोगत व्यक्त करत उपक्रमास शुभेच्छा दिल्या. समाजालापुढे नेणारी, विचारांची दहीहंडी ही प्रेरक असल्याचे सांगत मंगेश घोणे यांनी जेजुरी देवस्थान अशा उपक्रमांना कायम मदतीचा हात देईल असे सांगितले शिवव्याख्याते निलेश जगताप यांनी यावेळी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले .आई वडील, देश याप्रती निष्ठा ठेवून आपले नाव मोठे करा असे आवाहन जगताप यांनी यावेळी केले. वंदे मातरम् संघटनेचे झहीर मुलाणी, अमित वाल्मिकी कुणाल यादव, संजय टेकवडे, विक्रम माळवदकर, ॲड स्वाती बारभाई, शलाका मोरे यांसह अनिल पाटील, सुषमा रासकर, उज्वला जगताप, विशाल शिंदे, कैलास धिवार आदी प्रमुख याप्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments