Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेमध्ये कर आक्षेप सुनावणी यशस्वीरित्या पार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगर परिषदेच्या वतीने सासवड नगर परिषदेच्या हद्दीमधील मिळकतीची सुधारित पंचवार्षिक कर मूल्यांकन प्रतिक्रियेनुसार प्रारूप कर निर्धारण यादी चार जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, प्रारूप कर आकारणी यादीवर घेण्यात आलेल्या आक्षेपाच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यासाठी दिनांक 11 सप्टेंबर रोजी सासवड नगरपरिषद कार्यालय सासवड येथे मालमत्ता कर आक्षेप सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते, नगर परिषदेच्या कर प्रक्रिये बाबत नागरिकांकडून आलेल्या आक्षेप तक्रारी आणि सूचना यांचा सविस्तर विचार करून, योग्य निर्णय घेण्यासाठी ही सुनावणी आयोजित करण्यात आली होती, सुनावणीला मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक उपस्थित होते, प्राप्त आक्षेपावर सुनावणी घेण्यासाठी प्राधिकृत मूल्य निर्धारण अधिकारी तथा नगर रचनाकार बारामती शाखा बारामती यांच्या कार्यालयाकडून नगररचनाकार दत्तात्रेय तरोडे, सहाय्यक नगर रचनाकार सौरभ;); घोलप, अक्षय बराटे,आरेखक प्रणव भैलुमे आदी उपस्थित होते. नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभाग प्रमुख ओंकार शिंदे, सहाय्यक कर निरीक्षक श्रीमती बेनझीर शेख इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी पार पडली. नागरिकांनी त्यांच्या मालमत्तेच्या करा संदर्भातील नोंदीतील त्रुटी, कर मूल्यांकनातील विसंगती भूतकाळातील चुकीच्या नोंदी मिळकतीच्या क्षेत्रफळांमधील विसंगती, तसेच इतर अडचणी संदर्भातील अर्ज व प्रत्यक्ष मांडणी केली, कर निर्धारण यादीवर प्राप्त एकूण 582 आक्षेप अर्जापैकी 301 अजॅ धारक सुनावणीसाठी उपस्थित राहिले. सुनावणी संपल्यानंतर मुख्याधिकारी यांनी नागरिकांचे आभार मानले आणि कर निर्धारण प्रक्रियेतील पारदर्शकता आणि न्याय सुचिता करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. आक्षेप नोंदविल्यानंतर संबंधित प्रकरणाची छाननी करून, पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी कर भरणा करताना आपली मालमत्ता नोंद तपासावी, कोणतेही प्रश्न अथवा अडचणी असल्यास कर वसुली विभाग सासवड नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आव्हान त्यांनी करण्यात आले.वेळेवर कर भरणे ही नगरपरिषदेच्या विकासासाठी आवश्यक बाब असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments