Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरच्या सहसचिव पदी संदीप टिळेकर यांची निवड सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर या संस्थेच्या सहसचिव पदी गुरुकुल करिअर अकॅडमीचे संस्थापक प्राचार्य संदीप टिळेकर याच्या नावाची घोषणा केली. यावेळी दुसरे सहसचिव बंडू काका जगताप यांनी त्यांच्या निवडीला अनुमोदन दिले, प्रतिष्ठान अनेक वर्ष शैक्षणिक साहित्य, कला, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करत आहे, तर टिळेकर यांनी आत्तापर्यंत आपल्या करिअकॅडमी बरोबरच श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्था, रोटरी क्लब, साहित्य परिषद महात्मा फुले, सार्वजनिक ग्रंथालय आचार्य अत्रे वाचनालय, स्वर्गवासी चंद्रकांत टिळेकर शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान, पुरंदर तालुका ग्रंथालय संघ अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला मिळालेल्या जबाबदारीच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी केली असल्याचे, त्यांनी या पदावर निवड करण्यात आली आहे असे निवडीनंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे, दिलीप निरगुडे, रमेश जगताप, शशिकला कोलते, गौरव कोलते, रश्मी कोलते, अण्णा खाडे, बाळासो मुळीक, केशव काकडे, राजेंद्र जगताप, आनंदा जाधव, यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments