पुरंदर मधील भूसंपादनाला गती; तर शेतकऱ्यांची सहमती 72% हून अधिक शेतकऱ्यांनी दर्शवली सहमती 18 सप्टेंबर पर्यंत समिती पत्र सादर केल्यास मिळणार दहा टक्के विकसित भूखंड सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आलेला आहे, दिनांक 26 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या संमतीपत्र स्वीकारण्याच्या प्रक्रियेमध्ये अवघ्या 20 दिवसांमध्ये 72 टक्के होऊन अधिक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास सहमती दर्शवली आहे, संमती पत्र सादर करण्याची अंतिम मुदत ही 18 सप्टेंबर असून, त्यानंतर आठवडाभरात जमीन मोजणीला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी मुदतीत सहमती पत्र सादर करून दहा टक्के विकसित भूखंडाचा परतावा निश्चित करावा, असे आव्हान जिल्हा प्रशासन यांनी केलेले आहे. पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभार वळण, एखतपुर,पारगाव, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे, या प्रकल्पासाठी सुमारे 3000 एकर जमिनीचे भूसंपादन आवश्यक आहे, यापैकी 2011 हुन अधिक जमिनीची संमती पत्रे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे सादर केली आहेत. विशेषत मुंजवडी गावात 76 हेक्टर जमिनी पैकी 70 हेक्टर जमिनीची संमिती पत्र प्राप्त झाली आहेत, पूर्वीच्या अधिसूचनेनुसार 2673 हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते परंतु, आता त्यात 1388 हेक्टर ची कपात करून, क्षेत्र 1285 हेक्टर इतके निश्चित करण्यात आले आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल, जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी संमती पत्रे स्वीकारण्याची प्रक्रिया दिनांक 26 ऑगस्ट पासून सुरू केली असून, मुदतीत संमती पत्र सादर करणारे शेतकऱ्यांना दहा टक्के विकसित भूखंडाचा परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. यासाठी प्रथम येणाऱ्यास" प्रथम प्राधान्य हा निकष" ठेवण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत 1750 एकर जमिनीच्या भूसंपादनाला मान्यता मिळाली असून, एकूण क्षेत्राच्या 72% होऊन अधिक संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत. जिल्हाधिकारी यांनी दिली गावांना भेट जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी दि. 16 विमानतळासाठी भूसंपादन होणाऱ्या गावांना भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, त्यांनी शेतकऱ्यांना 18 सप्टेंबर पर्यंत संमिती पत्र सादर करण्याची आव्हान केली. मुदतीनंतर आठवडाभरात जमीन मोजणीला सुरुवात होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत संमती पत्र सादर करून, विकसित भूखंडाचा लाभ घ्यावा असे डुडी यांनी सांगितले. कुंभारवळण येथील शेतकरी बांधवांमधून गणेश मोरे, सागर कुंभारकर, प्रशांत कुंभारकर यांनी आपल्या गावच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या व्यथा विमानतळा संदर्भात मांडण्यात आल्या. कुंभारवळण ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी, कल्याण पांढरे उपजिल्हाधिकारी,संगिता चौगुले (राजापूरकर)उपजिल्हाधिकारी, वर्षा लांडगे प्रांत, विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर, स्वाती दहिवाल सार्वजनिक बांधकाम विभाग, स्मिता गौड भूमी अभिलेख ,श्रीधर चव्हाण कृषी अधिकारी पुरंदर, सागर ढोले वनविभाग अधिकारी पुरंदर ,मंडल अधिकारी शेळकंदे डी.सी आदित्य जोजारे तलाठी, ग्रामसेविका, विविध खात्याचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी ,सरपंच मंजुषा गायकवाड, उपसरपंच संदीप कामठे, देविदास कामठे, ग्रामपंचायत सदस्य, आजी, माजी व गावातील बहुसंख्य शेतकरी बांधव, कर्मचारी, महिला मंडळ, पत्रकार बांधव सुद्धा बहुसंख्येने हजर होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments