Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यामधील वाघापूर या ठिकाणच्या जमीन फसवणुकीतील प्रकरणांमधील वकिली पेशा असलेली पती-पत्नी दोन्ही आरोपी फरार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथे झालेल्या जमीन फसवणूक प्रकरणांमधील आरोपी सचिन जाधव आणि त्याची पत्नी अनुष्का उर्फ सुनीता जाधव हे दोघेही फरार झाले आहेत, सासवड पोलीस ठाणे येथे त्यांच्यावर विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे, तर गुन्हा दाखल सासवड मध्ये झाला असताना, वकिली पेशा असलेले सचिन जाधव यांनी सासवड मधील पत्रकार यांना बातमी लावायची नाही या कारणावरून, दमदाटी व शिवीगाळ केलेली आहे, वाघापूर येथील जमीन मालक आनंद सोनवणे आणि महेंद्र सोनवणे या भावाची 18 गुंठे जमीन खरेदी करण्याच्या नावाखाली तब्बल पाच एकर जमिनीची फसवणूक दस्त केल्याप्रकरणी आणि सोनवणे यांची मुलगी फिर्यादी पल्लवी सोनवणे यांना रिवाल्वर दाखवून, जाती वाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सचिन जाधव व सुनीता उर्फ अनुष्का जाधव यांच्यावर सासवड पोलिसांनी कारवाईचा भडगा उभारलेला आहे, गुन्हा दाखल होताच, या दामत्याने सासवड शहरातून पलायन केले असून, सासवड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, पुरंदर तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जमिनीला सोन्याचे भाव आलेले असून, त्यामुळे लँड माफिया कडून सर्वसामान्य लोकांच्या फसवणूक चे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत, पोलीस यंत्रणांनी असे गैरप्रकार थांबवावेत अशी अपेक्षा सामान्य नागरिकाकडून व्यक्त केली जात आहे, त्यामुळे निदान या प्रकरणात तरी पोलिसांनी प्रामाणिकपणे फिर्यादींना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी बांधव करीत असून, या प्रकरणातील आरोपीच्या फसवणुकीचे अनेक किस्से यापूर्वी घडले असल्याचे, तालुक्यात बोलले जात आहे, तर ग्रामीण भागामध्ये गावातील पारावर बसून, जेष्ठ नागरिक युवक वर्गामध्ये वकील विषयाच्या संदर्भातील पुरंदर मधील अशा घटना घडलेल्या चर्चा सध्या चालू आहेत, यातील एक आरोपी सचिन जाधव हा वकील आहे, त्यामुळे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडणार्‍या वकिली पेशालाच त्याने काळीमा फासण्याची चर्चा सध्या चालू आहे, अशा स्वरूपाचा आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास, त्यांनी तातडीने सासवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments