पुरंदर तालुक्यातील राख येथील जमीन गट नंबर 549 व 550 साठे खत झाले असताना; परत दुसऱ्यांदा मूळ मालकाने जमिनीचे साठेखत करून जमिनीची विक्री सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: राख( ता. पुरंदर )येथील जमीन गट क्रमांक 549 व 550 मधील एकूण साडेआठ एकर क्षेत्र विक्री करता निघाले असता ,श्रीमती इंदुबाई कृष्णा जयराम महानवर, यांची एक एकर ,श्रीमती फुलाबाई पांडुरंग महानवर यांची अडीच एकर, चंद्रभागा गुलाब महानवर यांची अडीच एकर, सई उर्फ जाई जयराम महानवर यांची अडीच एकर अशी एकूण साडेआठ एकर शेती विक्री करता करायचे असल्याने, ज्ञानदेव महानवर, फुलाबाई महानवर, यांचा मुलगा कामाजी, भाऊ, जयराम, गुलाब, सतीश महानवर यांच्याशी एकत्रित बसून, साडेआठ एकर जमीन 20 लाख 1000 रुपये प्रमाणे पांडुरंग नाथ्याबा दगडे यांनी साठेखत करताना, सरकारी मोजणी करूनच, खरेदीखत केले. व्यवहारापोटी दगडे यांनी चंद्रभागा महानवर यांची अडीच एकर क्षेत्राचे चार लाख रुपये त्यांचा मुलगा भाऊ महानवर यांच्या खात्यावर चेक द्वारे 00 480 अन्वये दि. 8 जानेवारी 2024 रोजी दिले, तर एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम दिली सई उर्फ जाई महानवर यांच्या चार लाख मुलगा ज्ञानेश्वर महानवर यांना आयसीसीआय बँकेतून त्यांच्या खात्यावर चेक क्रमांक 000619 अन्वये दि. 8 जानेवारी 2024 रोजी दिले, तर एक लाख तीस हजार रुपये सई उर्फ जाई महानवर यांना रोख रक्कम दिली. फुलाबाई महानवर यांची चार लाख रुपये मुलगा कामाजी महानवर यांना आयसीसीआय बँकेतून चेक क्रमांक 000 620 दि. 8 जानेवारी 2024 रोजी दिले, तर एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम रेखा महानवर यांना दिली. इंदुबाई महानवर यांच्या जमिनीचे तीन लाख वीस हजार सतीश महानवर यांच्या समक्ष इंदुबाई महानवर यांना रोख स्वरूपात दिले, सदरील व्यवहार पूर्ण झाल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालय पुरंदर येथील सासवड या ठिकाणी दस्त क्रमांक 263/2024 अन्वये साठेखत करून घेतले असता, जुलै 2025 मध्ये राख गावात गेले असताना, दगडे यांना असे निदर्शनास आले की, 549 व 550 मधील चंद्रभागा महानवर यांची अडीच एकर फुलाबाई महानवर यांची अडीच एकर इंदुबाई महानवर यांची एक एकर असे बाकी अडीच एकर एकूण साडे आठ एकर क्षेत्र विक्री ही दुसऱ्यांदा फुलाबाई पांडुरंग महानवर रा. जोगवडी यांनी त्यांच्या हद्दीतील गट क्रमांक 549 व550 साडेआठ एकर क्षेत्र सुनील दादा हाके, व सिदा दादा हाके यांनी दस्त क्रमांक 7442/ 2025 दि. 21 जुलै 2025 व 7719/ 2025 दि. ३० जुलै 2025 रोजी खरेदी केली असताना, असा व्यवहार झाला आहे. कायम खुश खरेदी खत केले आहेत, तर माझी रक्कम परत करा ,असे दगडे यांनी सांगितले असता, काहीच करून तुम्हाला देणार नाही, असे उत्तर महानवर यांनी केले, त्यामुळे दगडे यांची आर्थिक फसवणूक झाली असताना, इंदुबाई कृष्णा महानवर, चंद्रभागा गुलाब महानवर, फुलाबाई पांडुरंग महानवर, कामाजी पांडुरंग महानवर ,सतीश कृष्णा महानवर, पप्पू रामा हाके, सिद्धा दादा हाके, मोहन भाऊसो हाके, सुनील दादा हाके, विरुद्ध पांडुरंग नाथ्याबा दगडे (वय 43 वर्ष) व्यवसाय शेती रा. चौधरवाडी ता. पुरंदर यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. पोलीस हवालदार निता दोरके यांनी ही फिर्याद दाखल करून घेतली. तर दिपक वाकचौरे सहाय्यक पोलीस निरीक्षक जेजुरी यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कारंडे सहाय्यक फौजदार हे पुढील तपास करीत आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments