आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांच्या 234 वी जयंती निमित्त सासवड नगरपालिकेकडून साफसफाई अभियान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवडी( ता. पुरंदर) येथील हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूलच्या प्रांगणामध्ये आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची 234 वी जयंती खूप दिमाख्यात पार पडली. यावेळी सासवड नगरपालिका यांच्या विशेष सहकार्यातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, यासाठी गंगाराम जाधव माजी मुख्याध्यापक व उपाध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, यशवंत (बिटु तात्या) भांडवलकर माजी नगरसेवक यांच्या पुढाकाराने सासवड नगरपालिकेच्या सहकार्यातून कचरा, साफसफाई अभियान यशस्वीरित्या पार पडले. या ठिकाणी बिसलरी, कचरा, जेवणावळीची ताटे असे पाच ट्रॅक्टर भरून साहित्य संपूर्ण स्वच्छता सासवड नगरपालिकेकडून करण्यात आली, यासाठी सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुकादम सचिन गायकवाड, निलेश भोंडे यांनी काम कर्मचारी यांकडून करून घेतले. यासाठी मोहिनी जाधव, सुनिता लांडगे,, वैशाली देवकुळे, सुनीता भोंडे, रूपाली भोंडे, सोनाली भोंडे ,नंदा भोंडे आदींनी स्वच्छता करण्यात सहभाग घेतला, अशी माहिती गंगाराम जाधव जय मल्हार क्रांती संघटना कोर कमिटी उपाध्यक्ष व यशवंत (बिटु तात्या) भांडवलकर माजी नगरसेवक यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments