सासवड नगरपरिषद सासवड अंतर्गत तीन ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावाची सोय सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनास प्राधान्य द्या.सर्व सासवड शहरवासीयांना कळविण्यात आनंद होतो की, गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने नगर परिषद सासवडच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.प्रत्येक वर्षी जलस्रोतांमध्ये होणारे मूर्ती विसर्जन नैसर्गिक पाणथळांवर प्रतिकूल परिणाम घडवते. पाण्याचे प्रदूषण रोखणे, जिवसृष्टीचे संरक्षण करणे व निसर्गाचे संतुलन राखणे या उद्देशाने नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्यात आले आहेत.नगर परिषद सासवड सर्व गणेशभक्त, मंडळे व नागरिकांना विनम्र आवाहन करते की गणेश मूर्तीचे विसर्जन कृपया नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्येच करा.शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तींचा अधिकाधिक वापर करा. पाण्याचे व इतर नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. विसर्जन स्थळी स्वच्छता राखा व प्लास्टिकचा वापर टाळा.कृत्रिम तलावांची स्थाने पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत. नागरिकांनी सहकार्य करून एक आदर्श,प्लास्टिक मुक्त व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा.सासवड नगरपरिषदेच्या माध्यमातून गणेश भक्तांसाठी तीन ठिकाणी कृत्रिम तलावाची व निर्मल्य कलश्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये संगमेश्वर मंदिर परिसर, सोपानकाका मंदिर परिसर, वटेश्वर मंदिर परिसर या ठिकाणी विसर्जन व्यवस्था केली आहे.तसेच सदर ठिकाणी नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी उपस्थित आहेत.या ठिकाणी भाविकांकडून दिवसभरात 185 गणपती मूर्ती विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले आहे. सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलाश चव्हाण यांनी शहरातील सर्व गणेश भक्तांना आव्हान केले आहे, कि गणपती विसर्जन कृत्रिम तलावात करून पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यास नगरपरिषदेस सहकार्य करावे.तसेच निर्मल्यासाठी स्पेशल गाडी पाठवण्यात येणार आहे.आपल्या सहकार्यानेच आपण एक स्वच्छ, सुंदर आणि हरित सासवड घडवू शकतो.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments