एम.ई.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल सासवड प्रशालेमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीकमुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिना निमित सन २०१२ पासून २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो . या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनूर व तालुका स्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होणारे सर्व खेळाडू यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका सरोज मॅडम, क्रीडा शिक्षक नितीन ठोंबरे, व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक येळे भाऊसो यांनी केले व यांनी मेजर ध्यानचंद यांचा क्रीडा विश्वातील संपूर्ण प्रवास उपस्थितींना सांगीतला. मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनूर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगीतले तसेच तालुका स्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी सर्व खेळाडूंचे, घोष पथकाचे नेतृत्व करणारी साजिरी माने यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. या नंतर अक्षरा क्षीरसागर या विद्यार्थिनी सोबत सर्वांनी फिट इंडियाची शपथ घेतली. शेवटी खेळदल या तासिकेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा भारतीच्या 'खेल खिलाडी खेल' या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments