Hot Posts

6/recent/ticker-posts

अधिकारी कार्यालय पुणे 40 कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्त जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा पुरस्कार भाऊराव पुणे सर यांना सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे ,चॉईस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने यावर्षीचा जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा पुरस्काराने भाऊराव खुणे सर यांना सन्मानित करण्यात आलेआहे .महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुलांचे भावे हायस्कूल चे जेष्ठ क्रीडाशिक्षक भाऊराव खुणे सर गेली अनेक वर्ष सेवा करीत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूनी विविध स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे . विद्यार्थी प्रिय व शिस्तप्रिय शिक्षक ओळखले जातात. जिल्हास्तरावरील गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार सोहळा सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन पुणे या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, क्रीडा अधिकारी दादासो देवकाते, तालुका क्रीडा अधिकारी अश्विनी शिवानंद हत्तरंगे, प्राचार्य अल्ताफ अन्वर शेख, कॉलेजचे संस्थापक ताहीर हाशी यांच्या शुभहस्ते जिल्हास्तरी गुणवंत क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी क्रीडा भारती चे विजयराव रजपूत, बारामती जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे मा.प्राचार्य रामदासी सर, शिक्षक परिषदेचे शिवहार लहाने सर, नितीन राऊत सर, महात्मा फुले मंडळाचे मा. अध्यक्ष मधुकरराव राऊत, ताजने. तसेच अनेक मित्रमंडळी शुभेच्छा देण्यासाठी आले होते. सर्वांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments