पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी स्वच्छतेची शपथ सासवड प्रतिनिधी बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील संगमेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता करून, नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला नगर परिषदे समोरून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये सहभागींना स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले, 25 सप्टेंबर रोजी संपूर्ण सासवड शहर आज श्रमदान एक दिवस एक तास एक साथ ही भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये शहरातील नागरिक, शाळा, महाविद्यालय सामाजिक संस्था आणि महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले. अभियानाच्या प्रचार आणि जनजागृतीसाठी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, निवृत्त आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, स्वच्छता दूत सागर जगताप आणि पुरंदर हायस्कूलचे प्राचार्य इस्माईल सय्यद यांच्यासह अनेकांनी नागरिकांनी गुलाब पुष्प देऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, संगमेश्वर मंदिर परिसरात झालेल्या स्वच्छता मोहिमेत नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, विविध विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments