Hot Posts

6/recent/ticker-posts

पाणंद रस्ताच खुले करण्याबाबत माहुरगावचे ग्रामस्थ सकारात्मक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पु रंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान या कार्यक्रमानिमित्त पाणंद रस्ते खुले करण्यासाठी माहुर ता. पुरंदर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने श्री काळभैरवनाथ मंदिरात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले, या ग्रामसभेत आमदार रस्ते खुले करण्याबाबत चर्चा होऊन, ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला अशी माहिती ग्रामस्थ शंभू घाडगे यांनी दिली. या ग्रामसभेस अंगणवाडी सेविका सचिव रूपाली अधिकारी, माहूर गावच्या उपसरपंच मेघा जगताप, ग्रामपंचायत सदस्य रामदास जगताप, जयश्री भोसले, राजेंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत माहुरकर, पोलीस पाटील आरती जगताप, ग्राम महसूल अधिकारी धनंजय नाईक, अर्चना जगताप, शरद जगताप, तुकाराम जगताप आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments