Hot Posts

6/recent/ticker-posts

संत सोपानकाका सहकारी बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न... सभासदांना ९% लाभांश जाहीर.. ​सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संत सोपानकाका सहकारी बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २१) खेळीमेळीत संपन्न झाली. बँकेचे संस्थापक कै. चंदूकाका जगताप यांच्या दूरदृष्टीमुळेच बँक सक्षमपणे उभी असल्याचे जगताप यांनी सांगितले. सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे रविवारी (ता. २१) आयोजित या सभेला सभासद व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.​यावेळी बोलताना संजय जगताप यांनी सांगितले की, बँकेच्या प्रगतीमध्ये सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांचा विश्वास अत्यंत मोलाचा आहे. याच विश्वासाच्या बळावर बँक आर्थिक शिस्त आणि व्यवस्थापन राखत असून पुढील दोन वर्षांत बँकेचे शेड्यूल्ड बँकेकडे रूपांतर करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जगताप यांनी, ३१ मार्च २०२५ अखेर बँकेच्या ठेवी ७८६ कोटी २९ लाख रुपये असून, ४५७ कोटी ३३ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेला ७ कोटी ८३ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, ज्यामुळे संचालक मंडळाने सभासदांसाठी ९ टक्के लाभांश जाहीर केला. बँकेला स्थापनेपासून सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.​सभेचे सूत्रसंचालन सागर जगताप व पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे यांनी केले. बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप साबणे यांनी विषयवाचन केले. चर्चेमध्ये दिलीप गिरमे, विश्वास थेऊरकर, विशाल हरपळे, प्रवीण मांडके यांच्यासह अनेक सभासदांनी सहभाग घेतला. उपस्थितांमध्ये कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष तानाजी जगताप, नीरा बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे, बाळासो शिंदे, नंदकुमार जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. संचालक हेमंत भोंगळे, प्रकाश जगदाळे, दिलीप बडदे, संजय आंबेकर, शरदचंद्र जगताप, राजेंद्र बडदे, मनोहर पवार, धनंजय काकडे, अॅड युवराज वारघडे, धनसिंग भापकर, शेखर निकुडे, मार्तंड भोंडे, विजय थेऊरकर, संचालिका राजवर्धिनी जगताप, सविता ताकवले, पल्लवी बाजारे, रवींद्र जोशी, मुख्य अधिकारी चंद्रशेखर जगताप, गणेश मोहोळ, विश्वजीत आनंदे यांसह सभासद उपस्थित होते. शेवटी, उपाध्यक्ष शिवाजी ढमढेरे यांनी आभार व्यक्त केले.​फोटोओळ: सासवड (ता. पुरंदर): संत सोपानकाका सहकारी बँकेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दीपप्रज्वलन करताना संजय जगताप, रमणिकलाल कोठडिया, राजवर्धिनी जगताप व संचालक मंडळ.

Post a Comment

0 Comments