Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील ग्रामीणभागासह शहरात बैलपोळासन उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागात आणि सवड शहर व परिसरात भाद्रपदी बैलपोळा ऊत्साही, आनंदी वातावरण हलगी, डफड्याच्या तालावर साजरा करण्यात आला, थांबलेला पाऊस, जोमदार पिके व वातावरणातील उत्साह यामुळे बैलपोळयात विशेष उत्साह दिसून आला मात्र काही बैलांच्या पुढे डीजेच्या तालावर नाचत व फटाके फोडत मिरवणुकीला वेगळे स्वरूप प्राप्त जाले. चालू वर्षी सर्वत्र पाऊस दमदारपणे बरसलेला असून बहुतेक परिसरात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने खरिप हंगामातील पिके चांगली आली असून एकंदरित समाधानकारक पिके असल्याने साहजीकच शेतकरी वर्ग आनंदी असून ज्या बैलांच्या जीवावर शेती पिकवलेली आहे त्या बैलांचा म्हणजेच आपल्या लाडक्या सर्जा राजाचा बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करताना विशेष आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जाणवत होता. ग्रामीण भागासह तालुक्याच्या मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सासवड शहरात गेली दोन दिवसांपासून बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या नक्षीदार लेस, झालर, घुंगरमाळा, घंटी, फुगे, रंग यांसह अन्य वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली होती. आजही ग्रामीण भागात बैलपोळा हा सण ऊत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. या शिवाय बैलगाडा शर्यतींमुळे शेतकऱ्यांच्या पशुधनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बैलपोळ्याच्या दिवशी सकाळीच शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या पशुधनाला स्वच्छ आंघोळ घालून बैलांना झूली घालून गुलाल भंडाराची उधळण करित शिंगांना रंग व फुगे बांधुन सासवड शहरासह ग्रामीण भागातील गावागावातुन बैलांच्या भव्य मिरवणुका पारंपारिक वाद्यांच्या म्हणजेच हलगी डफड्याच्या तालावर काढल्या. बेफाम होवून बळीराजा या मिरवणुकीत नाचला. आशाच प्रकारे सासवड शहरातील शेतकरी व सासवडचे माजी उपनगराध्यक्ष विजय वाढणे, कारभारी संजय वढणे, व त्यांचे चिरंजीव साहिल वढणे, मनीष वढणे, राहुल वढणे, यांनी मिरवणूक काढली यात प्रवीण टिळेकर, सुनील वढणे, सुभाष शिवरकर, शरद चौखंडे यांनी सहभाग घेतला होता. फोटो : सासवड येथे बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला

Post a Comment

0 Comments