Hot Posts

6/recent/ticker-posts

भाद्रपद अमावस्यानिमित्त आज भाविकांनी देवदर्शनासाठी वीरच्या मंदिरात गर्दी केली तर श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत येत्या नवरात्र उत्सवानिमित्त जय्यत तयारी चालू असल्याचे निदर्शनास सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पहाटे चार वाजता देऊळवाडा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी सुरु करण्यात आला. दगडी कासवावर पारंपारिक गोसावी समाजाचा गोंधळाचा कार्यक्रम चालू होता. सकाळपासून भाविकामार्फत देवाला अभिषेक करण्यात आले. त्यानंतर दहीभाताची पूजा बांधण्यात आली. आज अमावस्येला कै. विलासराव धुमाळ यांचे स्मरणार्थ दिलीपदादा वि. धुमाळ, हनुमंत ना. धुमाळ,केरबा धुमाळ, प्रताप चव्हाण यांचेमार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्र उत्सवनिमित्त मंदिरातील विविध धार्मिक परंपरा, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, दोन्ही वेळेचा छबिना, पालखी, कोल्हाटी समाजाचा नर्तकीची हजेरी, याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले असल्याचे देवस्थान ट्रस्टमार्फत सुनील धुमाळ यांनी सांगितले. संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसरात स्वच्छता, औषधफवारणी, विविध शासकीय, निमशासकीय खात्यांना पत्रव्यवहार, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती असेही देवस्थान ट्रस्टमार्फत सांगण्यात आले . यावेळी देवस्थानचे चेअरमन राजेंद्र धुमाळ, व्हा.चेअरमन अमोल आ. धुमाळ, विश्वस्त विराज धुमाळ, काशिनाथ धुमाळ, अमोल धो. धुमाळ श्रीकांत थिटे, बाळासो समगीर,जयवंत सोनावने, प्रमिला देशमुख आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments