पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे बुधवारी महाराजस्व अभियान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंद र प्राईम न्यूज: परिंचे( ता. पुरंदर) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात तहसीलदार पुरंदर तसेच सर्व शासकीय विभागाच्या वतीने बुधवारी दि. 24 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर पार पडणार आहे. आमदार विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन केलेची माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली. या शिबिरामध्ये महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पोलीस, पशुधन, पाटबंधारे, महावितरण, सहकार, महिला व बालकल्याण, परिवहन, पुरवठा आदी विभागांचा समावेश आहे. शासनाच्या विविध योजना अंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थींना शिवतारे यांच्या असे प्रमाणपत्र व धनादेश देण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा ते पाच या वेळेत प्रत्येक विभागाचा दालन तयार करून, विविध योजना त्यासाठी लागणारे अर्ज कागदपत्राच्या अडीअडचणी समजून घेऊन, निराकरण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले असून, परिंचे मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन परिंचे मंडल अधिकारी बनसोडे तर तलाठी प्रमोद झुरंगे यासह पुरंदर तालुक्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments