शालेय साहित्य वाटप करून माजी उपनगराध्यक्ष खाजाभाई बागवान यांचा स्मृतिदिन साजरा.. सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगरपालिकेचे उपनगराध्यक्षखाजाभाई बागवान यांचा दुसरा स्मृतिदिन पुरंदरमधीलदिवे येथील जीवनवर्धीनी मतिमंद विद्यालयातील विशेष मुलांना भोजन देऊन तसेच त्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करून करण्यात आला. विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास मुखाध्यापक बाळासाहेब झेंडे, खाजाभाई बागवान यांचे बंधू पापाभाई बागवान व त्यांचा मित्र परिवार व कुटुंबियांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. आमयरा बागवान हिच्या शारदा स्तवनाने कार्यक्रम प्रारंभ झाला. ॲड अशपाक बागवान यांनी प्रास्ताविकातूनउपक्रमाची माहिती देत गतवर्षीही सासवड येथील संत नामदेव शाळेत विद्यार्थ्यांस साहित्य वाटप करण्यात आले होते असे सांगितले. खाजाभाई बागवान यांची राजकीय कारकिर्द, कुटुंबासाठीचे योगदान सांगत त्यांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, मोहिनी टी ग्रुपचे डॉ राजेश दळवी, माऊली गिरमेशहर पत्रकार संघाचे हेमंत ताकवले, आबीद आत्तार यांनी या वेळी मनोगतातून खाजाभाई यांच्या अनेक स्मृतींना उजाळा दिला. बागवान परिवाराच्या वतीने या प्रसंगी सासवड शहर पत्रकार संघास कृतज्ञता निधी देण्यात आला. जीवनवर्धीनी चे मुख्याध्यापक बाळासाहेब झेंडे यांनी बागवान यांच्या परिवाराचे या उपक्रमाबद्दल विशेष आभार मानले. गुरुकुल अकॅडमीचे प्रा संदीप टिळेकर यांनी सूत्रसंचालन केले तर मोबीन बागवान यांनी सर्वांचे आभार मानले. मोहन चव्हाण, दादा भुजबळ, बाळासाहेब कुलकर्णी गणेश मुळीक, संभाजी महामुनी, संदीप जगताप, जगदीश शिंदे, हरून बागवान, समीर बागवान, संपत शिंदे, सुमय्या बागवान, आसमाँ बागवान, शकील बागवान, जुबेर बागवान , तबस्सुम बागवान यांसह अनेक मान्यवर व विद्यार्थी आणि शिक्षक वृंद या प्रसंगी उपस्थित होते
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments