वाघीरे महाविद्यालयात सी.ए. क्षेत्रातील संधीबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयातील वाणिज्य व संशोधन विभागाच्या वतीने तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सी.ए. क्षेत्रातील संधीबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख साधन व्यक्ती म्हणून पुणे येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल सी.ए. श्री. अक्षय कोरडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, वाणिज्य शाखेचे समन्वयक डॉ. नरसिंग गिरी , वाणिज्य विभागप्रमुख डॉ. किशोर लिपारे तसेच वाणिज्य विभागातील प्राध्यापक व एकूण १२५ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. यानंतर आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी सी.ए. हे वाणिज्य शाखेतील सर्वोत्तम करिअर आहे, यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी सीए. हा सनदी लेखापाल असल्याने देशाच्या पंतप्रधानाच्या सहीपेक्षा सुद्धा सी.ए.च्या सहीला महत्व असते.या परीक्षेचा निकाल अत्यंत कमी लागतो पण योग्य मार्गदर्शन व अविरत प्रयत्न केल्यास ही परीक्षा उत्तीर्ण करणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सदर व्याख्यानातून विद्यार्थ्यांना उत्तम बौद्धिक मेजवानी मिळणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अक्षय कोरडे यांनी आपल्या व्याख्यानात, आजच्या जागतिकीकरणाच्या युगात सी.ए. क्षेत्रात असलेल्या संधीबाबत विवेचन केले. त्यांनी सी.ए. च्या परीक्षेचे टप्पे, त्याचा अभ्यासक्रम व सी.ए. झाल्यानंतरचे करिअर याचे विस्तृत विश्लेषण केले. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, जीएसटी, करनियोजन व करविश्लेषण, गुंतवणूक इत्यादी क्षेत्रात सल्ला व मार्गदर्शन यासाठी सी.ए. ची नितांत गरज असते त्यामुळे दिवसेंदिवस सी.ए. क्षेत्रातील लोकांची मागणी प्रचंड वाढत आहे त्यामुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सी.ए. क्षेत्रात करीअर केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन डॉ. किशोर लिपारे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. नरसिंग गिरी यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयामधील वाणिज्य विभागाने प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे केले. यासाठी डॉ.माधवी कामठे, डॉ.भाग्यश्री बोरावके , प्रा. आकाश झेंडे, प्रा. शुभम एक्के, प्रा.पूनम फडतरे, प्रा. पूजा शेलार, प्रा. श्वेता राजीवडे, प्रा. गौरी खोमणे, प्रा. आदिती पवार , संतोष लोणकर व अंकुश धायगुडे यांचे सहकार्य लाभले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments