Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील दिवे घाटात आज तीन तास वाहतूक बंद राहणार सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आळंदी ते श्रीशेत्र पंढरपूर पालखी महामार्गावरील दिवे घाटात रस्ता रुंदीकरणासाठी गुरुवारी दि. 5 रोजी नियंत्रित स्फोट प्लॅस्टिक करण्यात येणार आहेत, त्यामुळे सकाळी 11 ते दुपारी दोन पर्यंत दिवेघाटातील वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे, आळंदी ते श्रीशेत्र पंढरपूर पालखी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे, या कामांतर्गत दिवेघाट परिसरात नियंत्रित स्पॉट आधारे रुंदीकरण केले जाणार आहे, नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी दोन या कालावधीमध्ये दिवे घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि शहर वाहतूक पोलिसांनी घेतलेला आहे, या कालावधीमध्ये सासवड आणि पुण्याहून दिवेघाट मार्गे धावणाऱ्या एसटी व पी एम पी बस सेवा बोपदेव घाट मार्गे वळविण्यात येणार आहेत, या कालावधीत वाहन चालकांनी बोपदेव घाट या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे ही आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments