पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेनिमित्त वीर या ठिकाणी बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्रीशेत्र वीर तालुका पुरंदर येथे सध्या श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांचा यात्रा सोहळा सुरू असून, या यात्रेसाठी पुणे जिल्ह्याचे इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त दाखल होत आहेत, अनेक भाविक चार चाकी व दुचाकी वाहन आधारे श्री नाथाच्या दर्शनासाठी येत आहेत, मात्र काही विशिष्ट तसेच दांगडधिंगा करणाऱ्या युवकामुळे यात्रेच्या शांततेला भादा निर्माण होत असल्याचे, चित्र दिसून येत असून, या पार्श्वभूमीवर सासवड व परिंचे पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकावर दंडात्मक कारवाई केली आहे, यात्रा काळामध्ये वीर व परिसरात सर्व बाजूंनी मोठी गर्दी होत आहे, या गर्दीमध्ये काही दुचाकीस्वार वाहतूक कोंडी झाल्यानंतर, मोठ्या आवाजात सलग हॉर्न वाजून, त्रास देत होते, तसेच काहीजण बुलेट वाहनांमधून फटाक्यासारखे मोठे आवाज काढत होते, या प्रकारामुळे पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करीत, त्यांना समज दिली असून, या सोबतच मॉडिफिकेशन केलेल्या वाहनावरही पोलिसांनी कारवाई केली आहे, ही कारवाई सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप पवार, विशाल जाधव, गोपनीय कक्षाचे पोलीस हवालदार रुपेश भगत, पोलीस कॉन्स्टेबल किवळे, पोलीस हवालदार संतोष शिंदे, तसेच होमगार्ड सचिन पवार, श्रीकांत भंडलकर व प्रशांत आतकरी यांच्या पथकाने केली या कारवाईमुळे यात्रेकरूंनी समाधान एक प्रकारचे व्यक्त केले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments