Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भातून शेतकऱ्यांच्या असणाऱ्या मागण्या या सहा महिन्यात पूर्ण करणार राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही वाघापूर येथील बैठकीत शेतकऱ्यांशी संवाद सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे शासन निर्णय, पुरंदर उपसा जलसिंचन योजने संबंधित मागण्या येणाऱ्या या सहा महिन्यांमध्ये पूर्ण करणार असल्याचे, आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुरंदर मधील शेतकऱ्यांना दिले आहे. वाघापूर चौफुला येथे पार पडलेल्या शेतकरी सुसंवाद बैठकीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता, यावेळी पुरंदर उपसा जलसिंचन योजना व जानाई शिरसाई योजनेतील लाभार्थ्याकडून विविध मागण्यांची निवेदन विखे पाटील यांना देण्यात आले, यावेळी नुकताच सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्व सामावेशक असून, लाडकी बहीण योजनेमुळे लाडकी बहिणी सक्षम झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी हे दूषित असून, या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, ते पाणी शुद्धीकरण करून, शेतीसाठी मिळावे ,या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सहा महिन्यांमध्ये सर्व मागण्या पूर्ण करणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना याची ग्वाही दिली आहे. वीर नदी व करा नदी जोड प्रकल्प झाल्यावर, पुरंदरचा शेतकरी ' सुजलाम सुफलाम होईल, तसेच इथे मालक बसलाय त्यामुळे गडी काय करणार, असा उपरोधिक टोला ही माझी आमदार अशोक टेकवडे यांनी लगावला. यावेळी आमदार राहुल कुल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार संजय जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे, दिवे गराडे गटाच्या उमेदवार दिव्या जगदाळे, दिवे पंचायत समिती गणाचे उमेदवार देविदास कामथे, गराडे पंचायत समिती उमेदवार ललिता कटके, बेलसर माळशिर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अजय इंगळे, माळशिरस पंचायत समितीचे उमेदवार माऊली यादव व बेलसर पंचायत समिती गणाचे उमेदवार कैलास जगताप यांनी मनोगत आपले यावेळी व्यक्त केले. या निवडणुकीत भाजपला साथ द्या, असे आव्हान संजय जगताप, बाळासाहेब झिंजुर्के, मंजुषा गायकवाड, नाना भामे, सदाशिव डोंबाळे, पी.एस. मेमाणे, कैलास कामठे, रवींद्र फुले यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments