जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्रशासन सज्ज - वर्षा लांडगे७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रवारी रोजी मतमोजणीपात्र मतदारांना मतदान करण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दि. ६ : पुरंदर तालुक्यातील एकूण ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गणाकरिता ७ फेब्रुवारी रोजी मतदान नवीन प्रशासकीय इमारत सासवड येथे ९ फेब्रवारी रोजी मतमोजणी होणार असून याकरिता प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे. जिल्हा परिषद १९ ; पंचायत समितीकरिता ३३ उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२६ अंतर्गत तालुक्यातील एकूण ४ जिल्हा परिषद गट व त्या अंतर्गत ८ पंचायत समिती गणांकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रमाची १६ जानेवारी २०२६ रोजी सूचना प्रसिद्ध केली. उमेदवारांडून नामनिर्देशनपत्र १६ ते २१ जानेवारी या कालावधीमध्ये स्विकारण्यात आले होते नामनिर्देशनपत्राची छाननी करुन २२ जानेवारी रोजी निर्णय देण्यात आले. २७ जानेवारी रोजी उमेदवारी माघारी घेण्यात आली. जिल्हा परिषद गटामध्ये गराडे ३, बेलसर ६, वीर ६, निरा ४ असे एकूण १९ उमेदवार तसेच गराडे ३, दिवे ३, माळशिरस ५, बेलसर ५, भिवडी ३, वीर ५, कोळविहिरे ४, निरा शिवतक्रार ५ असे एकूण ३३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. निवडणुकीत १ लाख ८९ हजाराहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्कनिवडणूक कामकाजाच्याअनुषंगाने ३२ तालुकास्तरीय समन्वय अधिकारी, २० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण ८ भरारी पथकामध्ये १६ आणि ८ स्थिर निरीक्षण पथकामध्ये १६ तसेच २ व्हिडीओ निरीक्षण पथकामध्ये १ तसेच २ व्हिडीओ व्हिंविंग पथकामध्ये ८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकरिता एकूण २३८ अधिकारी, कर्मचारी तथा शिक्षकगण नियुक्त करण्यात आलेले आहेत. निवडणूक घोषित झालेल्या क्षेत्राची लोकसंख्या १८९८२३ असून त्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीकरिता मतदार संख्या पुरुष ९५,२७१, महिला ९५,१२९, इतर ३ असे एकूण १,९४, ४०३ इतकी आहे. एकूण २३५ केंद्र पुरंदर तालुक्यात २३५ केंद्र आहेत. याअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे नवीन इमारत उत्तरभिमुख इमारत पूर्वेकडील खोली क्रमांक २ येथे महिला मतदान केंद्र तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळे जुनी पूर्वाभिमुख इमारत खोली क्रमांक १ येथे आदर्श मतदान केंद्र असणार आहे. निवडणुकीकरिता कंट्रोल युनिट (सीयू) २३५ , बॅलेट युनिट (बीयू) २३५ याव्यतिरिक्त सीयू २४ आणि बीयू २४ राखीव ठेवण्यात येणार आहे. टपाली मतदानाकरिता ६११ अर्ज प्राप्त झाले असून आज अखेर ५५३ मतदारांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केले आहे. मतदारांकरिता मतदार केंद्रावर सुविधाप्रत्येक केंद्रावर स्वच्छतागृह, पाळणा, व्हीलचेअर, रॅम्प, वैद्यकीय सुविधा, पोलीस संरक्षण, अग्निशामक, वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित तसेच प्रसारमाध्यमातून मतदान करण्याबाबत प्रसिध्दी देण्यात आली आहे. विजयी उमेदवारांची नावे १० फेब्रुवारी २०२६ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. येत्या येणाऱ्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी केले आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments