Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील लपतळवाडी शाळेत अखेर प्रशासनाच्या वतीने शाळेला उपशिक्षक मिळाले सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: लपतळवाडी ता. पुरंदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकच शिक्षक असल्यामुळे, विद्यार्थ्यांची भरपूर प्रमाणामध्ये नुकसान होत असल्यामुळे, या ठिकाणी खुद्द संजय नाईकवडे शिक्षण अधिकारी पुणे व वैभव डुबल गटशिक्षण अधिकारी पुरंदर यांच्या सोमवारच्या दुपारी चार वाजताच्या चर्चा मधून, लपतळवाडी येथे उपशिक्षक देण्याचा निर्णय झाल्याने, मंगळवारी दि. 11 रोजी उपशिक्षक रुजू झाले असून, त्यामुळे ग्रामस्थासह, विद्यार्थी यामध्ये व समाधान व्यक्त केले जात आहे. शिक्षक एकच असल्यामुळे, शाळेतील विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले असताना, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना, नागरिकांनी संतप्त भावना निर्माण झाल्यामुळे, शाळेला टाळे ठोकले होते. जोपर्यंत उपशिक्षक मिळत नाही तोपर्यंत, टाळे उघडणार नाहीत. अशीच नागरिकांनी स्पष्ट इशारा दिलेला असून, त्याबाबत पुरंदर प्राईम न्यूज ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले असताना, त्वरित दखल घेऊन, प्रशासनाच्या वतीने संजय नाईकवडे शिक्षणअधिकारी व वैभव डुबल गटशिक्षणाधिकारी पुरंदर यांनी एका उपशिक्षकाची नियुक्ती केली आहे. त्यानंतर शाळेला तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपशिक्षक देण्यासंदर्भात लेखी असे आदेश काढण्यात आलेले आहेत. त्यासाठी सोमवारी चार वाजता माहूर येथील गोळे वस्ती शाळेतील दिनेश गजानन दुधाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. दि. 11 नोव्हेंबर पासून लपतळवाडी शाळेत रुजू होऊन कामकाज करण्याचे लेखी आदेश काढण्यात आलेले आहेत. गेली आठ ते नऊ महिन्यांपासून, शाळेत शिक्षक नसल्याची ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती ,परंतु वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामान्य नागरिकांनी केला आहे. त्यासाठी पुरंदर प्राईम न्यूजने वृत्त प्रसिद्ध केले होते, प्रशासनाच्या वतीने खुद्द शाळेला उपशिक्षक मिळाले असल्याचे, यासाठी सरपंच रवींद्र मोरे ,शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महादेव पिलाने, सुशील कुमार लोळे, ग्रामस्थ, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील, तटामुक्ती अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक, महिला ,युवक, शेतकरी बांधव यांनी पुरंदर प्राईम न्यूजचे आभार व्यक्त केले आहेत, तर यामध्ये पत्रकार यांनी शनिवारपासून ते मंगळवार पर्यंत चार ते पाच पेपरला बातमी आल्यामुळेच, पत्रकार यांचे सरपंच रवींद्र मोरे यांनी मनापासून आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments